पार्टीसाठी सगळी तयारी केली, पण कुणी आलंच नाही! उदास मुलीचा VIDEO VIRAL

कल्पना करा की, तुम्ही तुमच्या घरी जर एखाद्यी मजेदार पार्टी ठेवली असेल, त्याासाठी तुम्ही दिवसभर उत्साहाच्या भरात तयार सुद्धा केली असेल, पण त्या पार्टीला कुणी आलंच नाही तर? अगदी असंच काहीसं घडलंय या मुलीसोबत. पाहा हा viral video

dinner-party-viral-video
(Photo: Youtube/ VIRAL PARADISE NEWORK )

TikTok Viral Video: कल्पना करा की, तुम्ही तुमच्या घरी जर एखाद्यी मजेदार पार्टी ठेवली असेल, त्याासाठी तुम्ही दिवसभर उत्साहाच्या भरात तयार सुद्धा केली असेल, पण त्या पार्टीला कुणी आलंच नाही तर? खूप वाईट वाटेल, हो ना? सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा डायनिंग टेबलवर रिकाम्या ताटांसह उदास बसलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. खरं तर या मुलीने डिनरचा प्लॅन केला होता, ज्यामध्ये तिने तिच्या काही मित्र-मैत्रिणींना आमंत्रित केलं होतं. पण, या मुलीचे एकही मित्र-मैत्रिण मुलीच्या डिनर पार्टीसाठीआले नाही. म्हणून ही उदास मुलीचा नाराज होऊन डायनिंग टेबलवरच एकट बसून राहिली. पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुलगी डायनिंग टेबलवर बऱ्याच रिकाम्या प्लेट्ससोबत उदास बसलेली आहे. तिने तिच्या घरी मित्र-मैत्रिणींसोबत एक डिनर पार्टी ठेवली होती. यासाठी तिने घराची सजावट करून ठेवली होती. सर्वांना खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले होते. पण या बिचाऱ्या मुलीच्या घरी डिनर पार्टीला तिचे कुणीच मित्र-मैत्रिणी आले नाहीत. त्यामुळे ती उदास झाली आणि डायनिंग टेबलवर एकटीच बसून राहिली. इतकंच काय तर तिच्या मित्र-मैत्रिणींपैकी तिला कुणीच पार्टीला येणार नसल्याचं मेसेज करून सांगितलं सुद्धा नाही.

उदास मुलीच्या बॉयफ्रेंडने व्हिडीओ केला शेअर
मात्र, यानंतर मुलीच्या बॉयफ्रेंडने असं काही केलं की, ज्यामुळे तिचा मूड पूर्णपणे ठीक झाला. या मुलीचा व्हिडीओ अमेरिकेतील ख्रिश्चन झामोरा नावाच्या व्यक्तीने ‘किडलॉय’ या टिकटॉक अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १५ मिलियनपेक्षा ही जास्त लोकांनी पाहिलाय. या व्हिडीओवर प्रेक्षक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

क्रिस्टियन म्हणाला, “मला माझ्या गर्लफ्रेंडसाठी खूप वाईट वाटत होतं. मी तिचा मूड ठीक करण्याचा खूप प्रयत्न केला. पण कशानेच तिचा मूड ठीक होत नव्हता.” सुरूवातीला त्यांच्या डिनर पार्टीसाठी मित्र-मैत्रिणींना येण्यासाठी थोडा उशीर होईल, असं वाटू लागलं होतं. पण जवळजवळ तीन तास उलटून गेले तरीही तिचे मित्र-मैत्रिणी घरी आले नाहीत. त्यानंतर गर्लफ्रेंडचा मूड ठिक करण्यासाठी क्रिस्टियनने त्याच्या काही मित्रांना आणि भावाला डिनर पार्टीसाठी घरी बोलवून गर्लफ्रेंडला सरप्राईज दिलं. हे पाहून त्याची गर्लफ्रेंड खूप आनंदी झाली. त्या सर्वांनी मिळून दोघांसाठी काही खास वस्तू देखील आणल्या होत्या.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न मंडप सोडून नवरी पोहोचली जीममध्ये… ब्रायडल ड्रेसमधला तिचा वर्कआऊट पाहून नेटकरी हैराण

आणखी वाचा : VIRAL : महिलेची CISF जवानाला शिवीगाळ; थर्मल स्क्रिनिंगवरून बंगळुरू विमानतळावर घातला गोंधळ

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. एका युजरने लिहिलं, “मला मरियनसाठी खूप वाईट वाटलं”. दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिलं की, “क्रिस्टियन किती चांगला आहे, गर्लफ्रेंडचा खराब मूड पाहून त्याने तिची साथ सोडली नाही.” आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलं की, “बॉयफ्रेंड असावा तर असा…किती क्यूट आहे हा”. दुसऱ्या आणखी एका युजरने लिहिलं की, “यावरूनच तुम्हाला कळतं की कोण तुमचं आहे आणि कोण परकं आहे?”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A clip has gone viral of a woman sitting at a table on her own after no one showed up to her planned dinner prp

ताज्या बातम्या