Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण कुत्रा मांजरीचे व्हिडीओ शेअर करतात. तुम्ही आजवर अनेक पाळीव प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहिले असेल. काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही तर काही व्हिडीओ भावूक करणारे असतात. सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा हेल्मेट घालून बाइकवर बसताना दिसतो. व्हिडीओ पाहून तु्म्हीही थक्क व्हाल.

कुत्रा हा माणसाच्या अत्यंत जवळचा प्राणी मानला जातो. माणसाचा चांगला आणि प्रामाणिक मित्र म्हणून त्याची ओळख आहे. अनेक जण कुत्रा पाळतात आणि त्या कुत्र्यावर जीवापाड प्रेम करतात. कुत्रा सुद्धा दुप्पट त्याच्या मालकावर दुप्पट प्रेम करतो. कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा: Video : तब्बल १५ वर्षानंतर भेटली मैत्रीणीला! पाहा तो सुंदर क्षण, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल तुमचे मित्र- मैत्रीणी

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मालक दुचाकी घेऊन जात असतो तितक्यात एक कुत्रा तिथे येतो. त्याला मालकाबरोबर दुचाकीवर जायचं असते त्यामुळे तो स्वत:चे हेल्मेट तोंडात पकडून घेऊन येतो. त्यानंतर तो दुचाकीवर चढतो आणि मालक त्याला हेल्मेट घालून देतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की दुचाकीवर बसण्यासाठी कुत्रा हेल्मेट घेऊन येतो. आश्चर्य म्हणजे दुचाकी चालवताना हेल्मेट घालायचे , हे कुत्र्यालाही माहीत आहे. विशेष म्हणजे कुत्रा सुद्धा वाहतूक नियम पाळताना दिसतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : गाडीचा फुटला आरसा, चालकाने केला असा जुगाड की VIDEO पाहून पोट धरून हसाल

adultsociety या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जर तुम्ही दु:खी असाल तर पोस्ट पाहून तुम्हाला आनंद होईल.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याच कारणामुळे मला कुत्रे आवडतात” तर एका युजरने लिहिलेय, “माणसांपेक्षा कुत्रा प्रामाणिक आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला ही असाच कुत्रा पाहिजे”