मकर संक्रांत हा सण आंध्र प्रदेशातील एक प्रमुख सणांपैकी एक आहे. तिथे हा सण मोठ्या थाटामाटत साजरा करण्यात येतो. मात्र, यावेळी आंध्र प्रदेशातील एका कुटुंबाने संक्रांतीच्या दिवशी अशी गोष्ट केली हे कुटुंब एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे. सध्या हे कुटुंब सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. खरतरं या कुटुंबाने आपल्या होणाऱ्या जावयासाठी संक्रांतीनिमित्त भव्य मेजवानीचे आयोजन केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्र प्रदेशमधील नरसापुरम येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने संक्रांतीच्या दिवशी त्यांच्या होणाऱ्या जावयासाठी भव्य मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीत फक्त १०, २०, ३०, नाही तर चक्क ३६५ प्रकारचे पदार्थ बनवले होते. तेलुगू संस्कृतीत संक्रांतीच्या दिवशी जावयाला आमंत्रण देण्याची प्रथा आहे. या कुटुंबानेही तेच केले आणि ३६५ प्रकारचे पदार्थ आपल्या होणाऱ्या जावयाच्या स्वागतात बनवले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A family from andhra pradesh gave a grand feast to the future son in law 365 types of dishes served dcp
First published on: 18-01-2022 at 15:04 IST