सोशल मीडियावर रोज नवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. कधी कधी अशा गोष्टी पाहायला मिळतात की त्याचा आपण विचारही केला नसेल. त्यामुळे असे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. प्राणी, पक्षी यांचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. पण सापाचे व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. सापांच्या विश्वाबद्दल जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता असते. साप हा असा प्राणी आहे ज्याला पाहिल्यावर भल्याभल्यांची बोबडी वळते. पण, सध्या सापाचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत असून सापाची झाडावर चढण्याची पद्धत पाहून तुम्हाला अश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणपणे लहान ते मोठे साप अतिशय अवघड ठिकाणी अगदी सहजपणे चढतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर झाले आहेत. यात मोठ्या इमारतींवर साप चढताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महाकाय साप नारळाच्या झाडावर चढताना दिसत आहे. एक साप वेटोळे मारून झाडावर चढत आहे. नारळाच्या झाडावर वरच्या दिशेने जाताना साप चतुराईने झाडावर आपले शरीर घट्ट गुंडाळताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच हळूहळू करून वर चढतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A giant snake climbs a coconut tree video viral rmt
First published on: 24-03-2022 at 11:15 IST