scorecardresearch

तुटलेले पाय घेऊन रस्त्यावर फिरत होता इसम; बघणाऱ्या लोकांची भीतीमुळे झाली वाईट हालत

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा इसम पार्किंग एरियामध्ये आपले पाय आपल्या हातात घेऊन चालत आहे. या इसमाला बघून तिथे बसलेली मुलगी घाबरून पळून जाते.

हा व्हिडीओ ब्युटीफुल अर्थ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. (Photo : Instagram/ @beautiffulearth)

आज आपण असा एक व्हिडीओ पाहणार आहोत, जो पाहून तुम्हाला नक्कीच भीती वाटेल. तथापि, जेव्हा तुम्हाला या व्हिडीओची सत्यता समजेल तेव्हा तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये एक इसम आपले तुटलेले पाय घेऊन रस्त्यावर फिरत आहे. या व्यक्तीला पाहून रस्त्यावरील लोकांची बोबडी वळली आहे.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा इसम पार्किंग एरियामध्ये आपले पाय आपल्या हातात घेऊन चालत आहे. या इसमाला बघून तिथे बसलेली मुलगी घाबरून पळून जाते. यानंतर हा इसम एका लिफ्टमध्ये दिसतो. जसा लिफ्टचा दरवाजा उघडतो, त्याला पाहून दोन मुली खूप घाबरतात आणि तिथून पळून जातात.

या व्हायरल फोटोमध्ये दडलाय एक इंग्रजी शब्द; तुम्ही ओळखू शकता का?

आहेर द्यायला आलेल्या व्यक्तीने नवरदेवासोबत केले असे काही; नववधूसह पाहुण्यांनाही बसला धक्का

नंतर हा इसम एका आई आणि तिच्या मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. या इसमाला पाहून तो मुलगा इतका घाबरतो की त्याची हालत खराब होते. हा व्हिडीओ पाहून तुम्ही ही नक्कीच हैराण व्हाल. खरंतर हा प्रँक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ ब्युटीफुल अर्थ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, “लोकांच्या प्रतिक्रिया पाहा”

हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच अपलोड करण्यात आला असून हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तथापि हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकरी संतापले आहेत. या प्रकाराविरोधात लोक तक्रार करत असल्याची चर्चा आहे. एका युजरने म्हटले की, मुलांसोबत अशी प्रँक अजिबात योग्य नाही. हे मुलांना वाईटरित्या घाबरवू शकते. या प्रँक व्हिडिओवर बंदी घातली पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A man walking down the street with a broken leg people were scared pvp