सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या भन्नाट डान्स करणाऱ्या आजीबाईंचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
व्हिडीओतील आजीचा हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. वयाची पर्वा न करता, डान्सचा मनसोक्त आनंद घेणाऱ्या आजीबाईंची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत तरुणींबरोबर आजीबाईही जल्लोषात डान्स करताना दिसत आहेत. आजीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून कोणीही आजीचा चाहता होईल.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, आजीने तिच्याबरोबर डान्स करणाऱ्या तरुणींनाही मागे टाकले. इतक्या सर्व तरुणींमध्ये आजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एवढंच काय तर डान्स करताना आजीने या तरुणींचाही उत्साह वाढवला. उतारवयात आजीची ऊर्जा आणि उत्साह पाहून कोणीही थक्क होऊ शकतं

हेही वाचा : हेच खरं प्रेम! आजोबांनी पाकिटात अजूनही जपून ठेवलाय आजीचा फोटो, आजोबांचे प्रेम पाहून नेटकरी झाले भावुक…

marathi_status या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भन्नाट आजीबाई”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजीबाईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.” तर एका युजरने लिहिलेय, “वयाचं काय आहे; जन्म एकदाच होतो. आयुष्याचा भरपूर आनंद घ्यावा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुझ्याबरोबरच्या मुलींना जे जमलं नाही, ते तू केलं. खूप छान आजी!”