सध्या सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ आपल्या अंगावर शहारा आणणारे असतात. सध्या अशाच एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजगर मोठमोठ्या प्राण्यांनाही सहज गिळू शकतो. एखादा वन्य प्राणी किंवा माणूस जर अजगराच्या तावडीत सापडला तर त्याची सूटका होणे अशक्य असते. कधी कधी तर अजगर चक्क सिंहालाही गिळून टाकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका मांजराला अजगराने काही क्षणात गिळाल्याचं दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक मांजर आपल्या शिकारीच्या शोधात असल्याचं दिसत आहे. त्यासाठी ती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका बिळाच्या तोंडाशी डोकावताना दिसत आहे. मात्र, या मांजराला या बिळाच्या आत एक भलामोठा अजगर असल्याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे हे मांजर बिळाच्या तोंडाशी डोकावून पुढे जाणार तोच या अजगराने मांजारावर झडप घातली आणि काही कळायच्या आत त्याला आवळत गिळायला सुरुवात केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

police officer died after being hit by a car while rushing to help the injured
जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकरल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

हेही पाहा- मालकिणीला घरकामात मदत करताना वानराची दमछाक, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ @511turkee नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, मात्र हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर या ट्विटर धारकाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. कारण हा व्हिडीओ शेअर करताना ट्विटर धारकाने कॅप्शनमध्ये अजगराने पहाडी सिंहाला गिळालं असं लिहिलं आहे.

हेही पाहा- दोन मांजरींचा बाईकवरील प्रवासाचा Video होतोय व्हायरल, नेटकरी म्हणतायत ‘विश्वास आणि प्रेम…’

मात्र, हा सिंह नसून साध मांजर असल्याचं अनेक नेटकरी म्हणत आहेत. त्यामुळे हा सिंह की मांजर यावरुनच कमेंट बॉक्समध्ये मतभेद असल्याचं दिसत आहेत. पण सिंह असो वा मांजर अजगराच्या या भयानक हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला हे मात्र खरं. हा व्हिडीओ आतापर्यंत ६० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकांनी तो रिट्विटही केला आहे.