या लहान मुलाचा शाळेत जातानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरण कठीण होणार आहे. (Photo : Instagram)
सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ असे असतात की, जे पाहिल्यानंतर आपणाला हसू आवरणं कठीण होत. शिवाय ते व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह आपणाला आवरता येत नाही इतके मजेशीर ते असतात. सध्या अशाच एका लहान मुलाचा शाळेत जातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणं कठीण होणार आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
लहान मुलांना त्यांच्या पालकांसोबत शाळेत जाताना आपण अनेकदा पाहत असतो. यातील काही मुलं अगदी आनंदात आणि उत्साहाने शाळेत जातात. तर काही मुलांना शाळेत जायचं म्हटलं की जीवावर येतं. ज्या मुलांना शाळेत जायचं नसतं अशी मुलं बळजबरीने शाळेत पाठवणाऱ्या पालकांवर रागावलेले दिसतात. शिवाय कधी कधी ते एवढे रागवतात की रागाच्या भरात काहीतरी भलतं कृत्य करुन बसतात.
सध्या अशाच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये तो लहान शाळकरी मुलगा आपल्या आईसोबत स्कुटीवरुन जाताना दिसत आहे. या मुलाने शाळेचा ड्रेस घातला असून त्याच्या खांद्यावर स्कुल बॅगही दिसत आहे. मात्र, तो मुलगा ज्या पद्धतीने स्कुटीवर बसला आहे. ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आपलं हसू आवरता येत नाहीये. तर अनेकांनी ‘हा मुलगा अत्यंत धोकादायक पद्धतीने बसला असून थोडाजरी तोल गेला तर तो पडू शकतो,’ अशा कमेंट केल्या आहेत. मात्र, या मुलाची आई व्यवस्थित स्कुटी चालवताना दिसत आहे. तर मुलगा उदास होऊन विनाचप्पलीचा स्कुटीवर मांडी घालून बसला आहे. व्हिडीओतील दृश्यावरुन या मुलाची शाळेत जायची इच्छा नसतानाही आई जबरदस्तीने शाळेत घेऊन जात असल्याचं दिसत आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून इंस्टाग्रामवर dasadlatif1212 नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो पाहून पाहिल्यानंतर अनेकांना हसण्यावर नियंत्रण ठेवणं कठीण झालं आहे. आतापर्यंत २ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी तो लाईक केला आहे.