आयुष्य म्हणजे एक संघर्ष असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार, सुख-दुख येतात..जो या परिस्थितीवर मात करतो तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने आयुष्य जगतो. जिद्द असेल तर माणूस काहीह शक्य करू शकतो.काही लोक असे असतात आयुष्यात थोडी संकटे आली तर निराश होतात पण काही लोक असे असतात आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी त्याचा धैर्याने सामना करतात. कितीही कठिण परिस्थिती असेल तरी हार मानत नाही उलट संकटाचा सामना करून त्यावर मात करतात. अशाच एका दिव्यांग तरुणाची चर्चा होत आहे ज्याने आपल्या अंपगत्वावर मात करून असे धाडस करून दाखवले आहे ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.

सोशल मीडियावर एका दिव्यांग तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या दिव्यांग तरुणाने चक्क बंजी जंपिग करण्याचा धाडसं केलं आहे. बंजी जंपीग म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. उंचावरून हवेत उडी मारणे काही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. अनेकजण बंजी जंपिगचे करण्याचे स्वप्न पाहतात पण प्रत्यक्षात जेव्हा बंजी जंपिग करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचा आत्मविश्वास डगमगतो, पाय थरथरतात. देवाच्या नावाचा धावा करत लोक बंजी जपिंग करताना दिसतात. पण या दिव्यांग तरुणाने मोठ्या धैर्याने बंजी जंपिग करण्याचा धाडस केलं आहे जे पाहून सर्वत्र त्याचे कौतूक होत आहे.

व्हायरल व्हिडीओ rishikeshadventure नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. दिव्यांग तरुणाचा बंजी जंपिग करतानाचा रोमाचंक व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक दिव्यांग तरुण व्हिलचेअरवर बंजी जंपिग करण्याचासाठी सज्ज असल्याचे दिसते. हा तरुण आपल्या मित्रांबरोबर बंजी जपिंगचा आनंद घेताना दिसत आहे. पुढच्या क्षणी त्याचे मित्र त्याला व्हिलचेअरवरून उतरवून बंजी जंपिगसाठी तयार केलेल्या ट्रॅकवर ठेवतात. दिव्यांग तरुणाला सुरक्षेसाठी हार्नेस बांधलेली दिसत आहे. काही वेळा आत्मविश्वासाने तरुण बंजी जंप करताना दिसतो. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.

हेही वाचा – खेळकर कुत्रा अन् दयाळू वाहतूक पोलिस कर्मचारी, प्रेमळ मैत्रीचा Video Viral बघाच, तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ १ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर कमेंट करून अनेकांनी तरुणांचे आणि त्याला साथ देणाऱ्या मित्रांचे कौतू केले जात आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एकाने म्हटले,” जो चल नहीं सकता, वो उड़ सकता है बस बंजी जंपिग करत दिव्यांग तरुणानं दाखवलं धाडस, Viral Video बघाच संगत अच्छी होनी चाहिए” (“ज्याला चालता येत नाही त्याला उडता येत फक्त संगत चांगली पाहिजे.” दुसरा म्हणाला, “तो भाग्यवान आहे की त्याच्याबरोबर त्याचे मित्र आहेत.” तिसऱ्याने लिहिले, “कुठेही उडी मारण्यासाठी पाय नव्हे आत्मविश्वास असण्याची आवश्यकता आहे हे तुम्ही शिकवले.”

हाच व्हिडीओ शेअर करत डॉ. फेनिल शाह यांनी दिव्यांग तरुणाचे मानसिकतेचे कौतूक केले आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शमध्ये लिगिले की, मानसिकता महत्त्वाची – शारीरिक अपंगत्व तुम्हाला थांबवू शकत नसले तरीही साहस हे जीवनाकडे पाहण्याच्या तुमच्या मानसिक वृत्तीवर अवलंबून असते.”