देशामध्ये मिनी नायगरा म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध बस्तरचा चित्रकुट धबधब्यामध्ये मंगळवारी एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीने चक्क १०० फुट उंचीवरुन कोसळत्या धबधब्यामध्ये थेट उडी मारतानाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा धबधब्याच्या परिसरात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते त्यापैकी एकाने सर्व प्रकार व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी चित्रकुट येथील पुजारी पारा येथील रहिवासी आहे आणि कुटुंबाबरोबर मोबाईल फोनमुळे झालेल्या वादामुळे तिने आत्महत्या करण्यासाठी तिने धबधब्यामध्ये उडी मारल्याचे समजते. पण त्यानंतर ती उसळत्या धबधब्याच्या प्रवाहातून पोहत ती सुरक्षित बाहेर पडली ज्यानंतर त्वरित स्थानिक लोकांनी तरुणीला बाहेर काढले आणि चित्रकुट पोलिसांच्या ताब्यात तिला दिले.
पोलिसांनी तरुणीला आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण काय आहे चौकशी करत आहे. दरम्यान या घटनेमुळे भर पावासामध्ये चित्रकुट धबधब्याच्या येथील पोलिसांची सुरक्षा व्यवस्थेची पोल खोल झाली आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा धबधब्याच्या आसपास कोणतेही सुरक्ष कर्मचारी किंवा गार्ड नव्हते. ज्यामुळे धबधब्यामध्ये उडी मारण्यासाठी सहज पोहचू शकली आणि तिने थेट उडी मारली. पावसामुळे सध्या चित्रकुट धबधब्याने रौद्र रुप धारण केले असून उसळत्या प्रवाहसह वाहतो आहे. मोठ्या संख्येने पर्यटक धबधबा पाहण्यासाठी पोहचत आहे पण या धबधब्या जवळ सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नाही.
हेही वाचा – ”तुम्ही स्वत: कधी वेळेवर…”, उशीरा ऑफिसला येणाऱ्या कर्मचाऱ्याला नोटीस पाठवणे अधिकऱ्याला पडलं महागात!
मुलीचा जीव थोडक्यात वाचला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी चित्रकोट गावातील पुजारी पारा येथील रहिवासी आहे. मंगळवारी ती अचानक चित्रकोट धबधब्याजवळ पोहोचली आणि धबधब्यापासून सुमारे १०० फूट खाली उडी मारली, यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी आवाज देऊन मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही मुलीपर्यंत पोहोचण्याआधीच मुलीने धबधब्यात उडी मारली. नंतर उसळत्या प्रवाहात पोहत तरुणीने स्वत:ला धबधब्यातून सुखरूप बाहेर पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या धबधब्यावर अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, विशेषत: पावसाळ्यात या धबधब्यात पाय घसरून अनेकांचा मृत्यू झाला आहे, मात्र प्रत्येक वेळी सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. धबधब्याच्या आजूबाजूला मोठमोठे दावे केले जातात पण अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. उच्च पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की घटना घडली तेव्हा जवळच सुरक्षारक्षक उपस्थित होते, मात्र कोणाला काही समजण्याआधीच मुलगी थेट धबधब्याजवळ गेली उंचावरून पोहोचून उडी मारली.”