अॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी रेशम खान प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या चुलतभावनं तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. अॅसिड हल्ल्यामुळे रेशमचा चेहरा पूर्णपणे भाजला. विद्रुप झालेला चेहरा घेऊन समाजात वावरायचं कसं? ही भीती तिला सारखी छळू लागली. मात्र खचलेली रेशम नव्या दमाने उभी राहिली आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी करत असलेले प्रयत्न सोशल मीडियावर नोंदविण्यास सुरुवात केली. आज रेशम सोशल मीडियावर ‘स्टार’ झाली आहे. तिच्यापासून प्रेरणा घेत अनेक पीडित मुली समाजात खुलेपणानं वावरायला शिकल्या आहेत.
झिवाच्या गाण्याची गावकऱ्यांवर मोहिनी, व्हिडिओ पाहून पुजेसाठी पाठवलं आमंत्रण
जाणून घ्या ‘हॅलोविन नाईट’मध्ये भोपळ्याला सर्वाधिक महत्त्व का असतं?
नुकताच रेशमनं आपला एक फोटो ट्विटरवर शेअर केला. ‘आता लपवण्याची वेळ निघून गेली आहे’ असा संदेश देत रेशमनं हा फोटो शेअर केला आहे. अनेकांनी रेशमच्या या बिनधास्तपणाचं कौतुक केलं आहे. अॅसिड हल्ल्यातल्या पीडित मुली तणावामुळे घराबाहेर पडत नाही. लोक काय म्हणतील, मला विद्रुप चेहऱ्यासकट समाज स्विकारेल का? अशा एक ना अनेक भावना त्यांना छळत असतात. अशा सर्व पीडितांना नवी उमेद देण्याचं काम रेशम करत आहे. यावेळी आपला फोटो शेअर करून घरात लपून न राहता खुलेपणानं समाजात वावरण्याचा मोलाचा संदेश तिनं दिला आहे.