विमान प्रवासादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा विमानतळ कर्मचाऱ्यांकडून काही वस्तूंना सोबत नेण्यास मनाई करण्यात येते. हिमांशू देवगन या व्यक्तीलाही थायलंडच्या फुकेत विमानतळावर असाच काहीसा अनुभव आला. विमानात सामानासोबत गुलाब जामूनचा डबा नेण्यास देवगन यांना कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला. दिवसाची चांगली सुरुवात झाल्याचे म्हणत या प्रवाश्याने उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये गुलाब जामून वाटून आनंद साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ देवगन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला १० लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे.
उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले; नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला
या व्हिडीओमध्ये देवगन विमानतळ कर्मचाऱ्यांना गुलाब जामून खाण्याचा आग्रह करताना दिसत आहेत. “फुकेत विमानतळावर सुरक्षा तपासणीत कर्मचाऱ्यांनी गुलाब जामून नेण्यास मनाई केली. त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत आनंद वाटून घेत गुलाब जामूनचा आस्वाद घेतला”, असे देवगन यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खाद्य पदार्थ वाया घालवण्यापेक्षा देवगन यांनी केलेली कृती योग्य असल्याचे काही युझर्सने म्हटले आहे. विमान प्रवासासाठी विमानतळ प्रशासनाने काही नियम आखून दिले आहेत. यानुसार धारधार वस्तू नेलकटर, चाकू, लोखंडी वस्तू, हत्यारे, रेझर, सुईवर विमान प्रवासात बंदी आहे. काही विमानतळावर पाण्याची बाटलीदेखील नेण्यास मनाई करण्यात येते. खाद्यपदार्थ किंवा कुठलेही पेय नेण्यासही विमानतळावर बंदी घालण्यात आली आहे.