scorecardresearch

Video: …अन् संतापून अजित पवार म्हणाले, “अरे किती पुतळे?”; पाहा नेमकं घडलं काय

अजित पवार जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी विनंती केले असते असं का म्हणाले जाणून घ्या

Ajit Pawar Angry
कॅमेरांसमोरच अजित पवार यांनी केलं वक्तव्य

राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी आणि वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा न पटलेल्या गोष्टी ते सरळ बोलून दाखवतात. मग अगदी ते प्रसारमाध्यमांचे प्रतिनीधी असो किंवा पक्षाचे कार्यकर्ते असोत, विषय पटला नाही की अजित पवार आपल्या खास शैलीत सर्वांसमोर त्या विषयावरुन टोला लगावल्याशिवाय राहत नाहीत. असाच काहीसा प्रकार आज बुलढाण्यात.

बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवार यांनी आज सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी, जिजाऊ जन्मस्थळ राजवाडा, आणि इतर ठिकाणी भेटी दिल्या. याच भेटींदरम्यान सकाळीच ते बुलढाणा शहरातील दोन ठिकाणांनाही भेट दिली. या ठिकाणी राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं. तसेच राजवाड्यात देखील पुन्हा एक पुतळा असल्याने अजित पवार यांना पुन्हा पुतळ्याला हार घालण्याची विनंती करण्यात आली. मात्र एवढे पुतळे पाहून अजित पवार जिल्हाधिकारी नाझिर काजी आणि पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यावर चिडले. “अहो, किती पुतळे? झालं ना आता. तिथं आत तीन पुतळ्यांना हार घातला,” असं अजित पवार म्हणाले.

एकच स्मारकामध्ये त्याच त्याच महापुरुषांचे अनेक ठिकाणी पुतळे उभारलेलं पाहून अजित पवारांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल्याचं दिसून आलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar angry by seen so many statues at same location in buldhana scsg