मध्यंतरी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (सीबीएफसी) अनेक सिनेमांमध्ये सुचवलेल्या बदलांच्या सुचनांवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. प्रामुख्याने उडता पंजाब सिनेमामध्ये चक्क ९४ ठिकाणी कट्स सुचवण्यात आल्याने सीबीएफसीवर सर्वच स्तरातून टिका झाली होती. त्यानंतर आता अॅमेझॉन आणि नेटफिक्सवरील माहितीवर सेन्सॉर लवाण्यासंदर्भातही चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भातील निर्णय अद्याप झाला नसला तरी अनेक मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि स्मार्ट उपकरणांमध्ये कंपन्यांनी स्वखुशीने सेन्सॉर सिस्टीम लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही सेन्सॉरशिप लावताना तांत्रिक अडचणींमुळे युझर्सला नको तो त्रास सहन करावा लागत आहे. ट्विटवर नुकताच एका युझरने अशाच डिजीटल सेन्सॉरशिपचे एक भन्नाट पण तितकेच मजेदार उदाहरण शेअर केले आहे.

अभिजात हिंदी गाण्यांपैकी एक असणारे ‘अभी ना जाओ छोड कर’ हे गाणे ‘सावन’ या गाण्यांच्या अॅपने सेन्सॉर केले आहे. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या सुरेल आवाजातील ‘हम दोनो’ सिनेमातील हे गाणे आहे. या गाण्यातील ‘छोड’ हा शब्दाचा उच्चार एका शिवीशी साधर्म साधणारा असल्याने हे गाणे सेन्सॉर केले जात आहे.

ट्विटवर रोहित भारती या युझरनेही यासंदर्भातील आपला अनुभव ट्विट करुन शेअर केला आहे. ‘अॅलेक्सा’ या स्मार्ट स्पिकर्सला जेव्हा रोहितने हे गाणे प्ले करायला सांगितले तेव्हा हे गाणे ‘अभी ना जाओ Beeeeppp कर’ असे वाजू लागले. यासंदर्भातील ट्विट त्याने केले.

तसेच या गाण्याचे टायटलही ‘Abhi Na Jao C***d Kar’ असे दिसत असल्याचेही रोहितने ट्विट केले आहे.

त्यानंतर रोहितने ‘छोड’ हा शब्द असणारी सगळी गाणी सावन या गाण्याच्या अॅपवरून अॅलेक्सावर सेन्सॉर होऊऩच प्ले होत असल्याचे फोटो ट्विट केले आहे. ‘मार दिया जाऐ या छोड दिया जाए’, ‘छोड दो आलच जमाना क्या कहेंगा’ या गाण्यांच्या टायटलचे सेन्सॉर फोटो रोहितने ट्विट केलेत.

रोहितने ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर नेटकरी या चुकीवर अगदी तुटून पडले. अनेकांनी या Beeeeppp सहित वाजणाऱ्या गाण्यांचे तसेच सेन्सॉर टायटलचे फोटो ट्विट केले आहेत.

हे खरं आहे

संस्कारी अॅलेक्सा

मीही ट्राय केले आणि हा आहे निकाल

भ्रष्ट बुद्धी

खरचं काय आहे हे

हे असंही लॉजिक

जुना ब्लॉग आठवला

अनेकांनी ‘सावन’ अॅपच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलला टॅग करुन ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर ‘सावन’ अॅपनेही हे असे का होत आहे याबद्दल आम्हालाही कल्पना नसल्याची माहिती ट्विट करु दिली आहे.

तर काही युझर्सने सावन अॅप नाही तर अॅमेझॉनच्या ‘अॅलेक्सा’ने हे सेन्सॉर केल्याचे मत नोंदवले आहे. आता यामध्ये नक्की कोणी हे सेन्सॉर केले आहे हा वादाचा विषय असला तरी यामुळे चांगली गाणी Beeeeppp सहीत ऐकावी लागतायत हे मात्र नक्की.