‘अलीबाबा’ ही चीनमधली सगळ्यात अग्रगण्य ई-कॉमर्स साईट आहे. या कंपनीचे संस्थापक जॅक मा हे जगातील अब्जाधीशांपैकी एक. गेल्याच आठवड्यात अलीबाबाचा १८ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. वर्धापनाचा सोहळा खूप मोठा आणि नेत्रदीपक होता. कर्मचाऱ्यांसाठी खास कार्यक्रमही ठेवण्यात आले होते. संस्थापक जॅक मा हे या सोहळ्याचे उत्सवमूर्ती होते. कर्मचाऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या पार्टीमध्ये ते व्हीव्हीआयपी रांगेत बसतील, कार्यक्रमाच्या शेवटी उठून दाद मिळवणारं एकदम हटके भाषण करतील असंच सगळ्यांना वाटलं. पण ‘जे इतर करतात तेच आपण का करावं? काहीतरी वेगळं करण्याचं तर जगात नाव होतं’ असा फंडा मानणाऱ्या जॅक यांनी पॉपस्टार मायलक जॅक्सनच्या गाण्यावर डान्स करून सोहळ्याचा नूरच पालटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : अवघड इंग्रजी सोपं करणाऱ्या शब्दकोशाच्या जनकाला ‘गुगल डुडल’द्वारे मानवंदना!

५३ वर्षांचे जॅक मायकल जॅक्सन सारखा पेहराव करून स्टेजवर आले. जॅक यांनी मायकलच्या दोन तीन गाण्यांवर नृत्यही केलं. वर्धापनाच्या सोहळ्यात जगातील श्रीमंत माणसाला इतक्या दिलखुलासपणे नाचताना क्वचितच कोणी पाहिले असेल. प्रत्येक कर्मचारी जॅक यांचा डान्स आपल्या कॅमेरात टिपण्याच्या प्रयत्नात होता. पण असं काहीतरी हटके करून कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्क देण्याची जॅक यांची ही काही पहिलीच वेळ नाही. अलीबाबाच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात देखील हजारो कर्मचाऱ्यांच्या गर्दीसमोर जॅकयांनी ‘द लायन किंग’मधलं गाणं गायलं होतं.

वाचा : एकेकाळी रस्त्यावर झोपणारा ‘तो’ तरुण आज कोट्यवधीचा मालक!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alibaba billionaire founder jack ma dance on michael jackson moves
First published on: 18-09-2017 at 13:39 IST