Viral Video : पुणे हे देशातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वास्तू आणि खाद्य संस्कृतीने या शहराला एक वेगळी ओळख दिली आहे. सांस्कतिक शहर आणि विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात दरवर्षी हजारो तरुण मुले मुली नोकरी आणि शिक्षणासाठी येतात. आज पुणे खूप बदलले. पुण्याची रस्ते, पुण्याचे स्वरूप बदलले. विकासामुळे अनेक नव्या गोष्टी पुण्यात पाहायला मिळाल्या तरीसुद्धा जुने पुणे सर्वांना आवडते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील जुनी पीएमटी दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला जुने पुणे आठवतील. सध्या व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक जुनी पीएमटी बस दिसेल. ही पीएमटी बस पाहून अनेकांच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओत पुण्यातील लोकप्रिय डेक्कन स्टॉप दाखवला आहे. डेक्कन स्टॉपवर बस येते तेव्हा काही प्रवासी खाली उतरतात तर काही प्रवासी बसमध्ये चढताना दिसतात. पुढे ही बस डेक्कन स्टॉपवरून निघते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.ही जुनी पीएमटी पाहून काही लोकांना त्यांचे जुने दिवस आठवतील. काही लोकांच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : आनंद महिंद्रा ‘कळसूबाई’च्या प्रेमात; विलोभनीय VIDEO पोस्ट करीत म्हणाले, “वेळ काढा आणि…”

पाहा व्हायरल व्हिडीओ

_punethings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आठवणीतले पुणे …ओळखा कोणता स्टॉप आहे ?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच जुन्या बसेस आताही पाहिजे होत्या तेव्हाच खरं पुणे वाटायचं पण आता पुण्याची मुंबई झाल्यासारखी वाटते, सगळीकडे ट्रॅफिकजाम, गाड्यांची गर्दी, मेट्रोचे जाळे, बाहेरून पुण्यात येणारे लोक, त्यामुळे पुण्यात वाढलेली गर्दी त्यामुळे पुणेरी पेठाही नामशेष होत आहे. खरं सांगायचं तर पुण्याचे पुणेरीपण बदलल्या काळानुसार हरवून गेले आहे, ही खूप खेदाची गोष्ट आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “काय वेळ होती राव तेव्हा.. पीएमटी ट्रॅव्हलींग एक फिलिंग होतं. कंडक्टर ड्रायव्हर एक दिवस नाही दिसले की विचारायचे काय बाळांनो काल नव्हते तुम्ही.. एवढी ओळख असायची. आता तोंड दिसत नाही लवकर कोणाचं” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी लहानपणी याच बसनी प्रवास केला आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune old memories do you travel in by pmt bus video goes viral on social media ndj