रतन टाटांकडून धडा घेत सर्वच सोसायट्यांनी भटक्या कुत्र्यांची काळजी घ्यावी; प्राणीमित्रांची अपेक्षा

काही दिवसांपूर्वीच रतन टाटांनी एक फोटो पोस्ट केला होता

टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या समृद्ध औद्योगिक वारश्याबरोबरच दातृत्वासाठी, श्वानप्रेमासाठी, साधेपणसाठीही ओळखले जातात. रतन टाटा मागील काही महिन्यांपासून सोशल नेटवर्किंगवरही सक्रीय झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी टाटा समुहाच्या माध्यमातून रतन टाटा हे मुंबईमधील बॉम्बे हाऊसमध्ये देखभाल केल्या जाणाऱ्या रस्त्यावरील कुत्र्यांसोबत दिवाळी साजरी केल्याचे फोटो पोस्ट केला होता. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. मात्र याच फोटोवरुन प्रेरणा घेऊन सर्व सामान्यांनाही आपल्या परिसरामधील कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी इच्छा आता प्राणीमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> कुत्र्याचं नाव गोवा असं का ठेवलं?; रतन टाटांनी त्या कमेंटला दिला रिप्लाय

रतन टाटा हे इन्स्टाग्रामवरुन वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून स्वत:बद्दलची माहिती आणि पूर्वी कधीही समोर न आलेले त्यांच्या आठवणींमधील फोटो पोस्ट करत असतात. रतन टाटा हे त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांबद्दल सोशल नेटवर्किंगवरुन चाहत्यांना रंजक माहिती देत असतात. असाच एक फोटो त्यांनी नुकताच शेअर केला. रतन टाटा हे मुंबईमधील बॉम्बे हाऊसमध्ये राहतात.  रतन टाटा यांना कुत्र्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. अनेक प्राणी मित्र संघटनांना ते मदत करत असतात. त्यांच्या बॉम्बे हाऊसमध्येही दोन जर्मन शेफर्ड कुत्र्यांबरोबरच काही दत्तक घेतलेले कुत्रेही आहेत. याच कुत्र्यांबरोबरचा एक फोटो रतन टाटांनी दिवाळी निमित्त शेअर केला आहे. बॉम्बे हाऊसमधील कुत्र्यांबरोबरच हे काही खास क्षण दिवाळीदरम्यानचे आहेत. यापैकी गोवा हा खूप खास आहे कारण तो मला ऑफिसमध्येही सोबत करतो, असं रतन टाटांनी म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ratan Tata (@ratantata)

रस्त्यावरील कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या अबोध अर्स यांनी याच फोटोचा संदर्भ देत प्राणीमित्रांनाही रतन टाटांप्रमाणे पुढे येऊन रस्त्यावरील कुत्र्यांना आधार द्यावा असं मत टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केलं आहे. “रतन टाटा यांनी प्राण्यांबद्दल असणाऱ्या प्रेमातून हाती घेतलेला हा उपक्रम हृदयद्रावक आहे. त्यांच्या बॉम्बे हाऊसमध्ये अशा अनेक कुत्र्यांची देखभाल केली जाते. आमच्या एनजीओचे लोकं अनेकदा प्राण्यांची पहाणी करण्यासाठी बॉम्बे हाऊसला भेट देतात. टाटा समुहाकडून या परिसरातील इतर कुत्र्यांचीही काळजी घेतली जाते. कुत्र्यांची अशाप्रकारे काळजी घेण्याचा धडा सर्वच रहिवासी संकुलांनी टाटांकडून घेण्याची गरज आहे,” असं अबोध यांनी म्हटलं आहे.

“अनेक सोसायट्यांमध्ये कुत्रे आणि मांजरी असण्याला विरोध असतो. अनेकदा या प्राण्यांना खायला देणाऱ्यांना त्रास दिला जातो. अशाप्रकारे प्राणी मित्रांना त्रास देणे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे,” असंही अबोध यांनी नमूद केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: All housing complexes must follow this lesson of compassion from ratan tata scsg

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या