आपला एक हात तुम्ही किती वेळ आकाशाच्या दिशेने ठेवू शकता? पाच मिनिटं, दहा मिनिटं, १५ मिनिटं? लहानपणी शाळेत दोन्ही हात वर करण्याची शिक्षाही अनेकांना दिली असेल. दोन ते तीन मिनिटात आपला हात दुखू लागतो. मात्र भारतात असे एक संत राहतात ज्यांनी १९७३ पासून आपला उजवा हात आकाशाच्या दिशेने केला आहे. ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपला एक हात आकाशाच्या दिशेने केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. Historic Vids या ट्वीटर हँडलने हा फोटो पोस्ट केला आहे. ज्यानंतर हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ५ हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो रिट्वीट केला आहे. तर लाखो लोकांनी हा फोटो पाहिला आहे. तर या फोटोला लाखो लाईक्सही आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा फोटो कुणाचा आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा फोटो नेमका कुणाचा आहे?

फोटोत दिसणारे हे संत आहेत अमर भारती. १९७३ मध्ये त्यांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय अद्भुत होता असंच म्हणावं लागेल कारण त्याची कल्पनाच कुणी केली नव्हती. त्यांचा व्हायरल झालेला हा फोटो पाहून लक्षात येतं की गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी हात खाली घेतलेला नाही. त्यांचा हात सुकला आहे, त्यांच्या हाताची त्वचा सुकली आहे, हाडाचा एक तुकडा म्हणजे त्यांचा हात असंच त्यांच्या हाताचं वर्णन करता येईल. जगात सद्भभावना वाढली पाहिजे हा निर्णय घेऊन देवाच्या दिशेने आपण आपला हात ठेवला आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांची ही अद्भुत इच्छा शक्ती कौतुकास्पद आहे.

कोण आहेत अमर भारती?

ट्वीटरवर हिस्टोरिक वैदीक नावाच्या अकाऊंटने अमर भारती यांचा फोटो शेअर केला आहे. अमर भारती हे प्रसिद्ध साधू आहेत. ते अनेकदा कुंभ मेळ्यांमध्ये आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. १९७० च्या आधी अमर भारती हे मध्यमवर्गीय घरातले व्यक्ती होते. सामान्य माणसांप्रमाणेच ते नोकरीही करत होते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी, मुलं असं कुटुंबही होतं. मात्र एक दिवस सकाळी ते उठले आणि त्यांनी आपलं आयुष्य भगवान शंकराला अर्पण केल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. नेटकरी साधू अमर भारती यांचं कौतुक करत आहेत. अनेकांना हा फोटो पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कुणी विचारतं आहे की त्यांनी हा हात कधीच खाली घेतला नाही का? तर कुणी विचारतं की ते झोपतात कसे? मात्र त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amar bharati a hindu sadhu elevated his right hand in 1973 and has steadfastly kept it raised ever since do you know who is he scj
First published on: 02-06-2023 at 08:45 IST