अ‍ॅमेझॉनने नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलची घोषणा केली आहे. सेलची सुरुवात २६ जुलै पासून होणार आहे. भारतातील अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलचा यंदा पाचवा वर्धापन दिन आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, यावर्षी प्राइम डे सोबत कोव्हिड -१९ मुळे पडलेल्या प्रभावापासून कारागीर, उत्पादक, छोटे व्यवसाय, स्टार्टअप्स आणि बऱ्याच ब्रॅण्ड्सला मदत करण्याच्या दृष्टीने हा सेल महत्त्वाचा आहे.

किती वाजता सुरु होणार हा सेल?

२६ जुलै आणि २७ जुलै या दोन दिवशी हा सेल असणार आहे. याची पुष्टी अ‍ॅमेझॉनने दिली आहे. २६ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजता हा सेल सुरू होईल.

सेलमध्ये कोणत्या वस्तू असतील?

कंपनीचे म्हणणे आहे की सॅमसंग, शाओमी, विप्रो, बजाज ब्रँड्सकडून ३०० हून अधिक नवीन उत्पादने अ‍ॅमेझॉनवर सेलमध्ये असतील . अ‍ॅमेझॉनने नमूद केले आहे की या विक्रीमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, अ‍ॅमेझॉन डिव्हाइस आणि अशा बऱ्याच अन्य विविध श्रेणीतील ऑफरचा सेलमध्ये समावेश असेल.

ऑफर काय आहेत?

एसएमबीद्वारे (SMB ) देण्यात येणाऱ्या उत्पादनांमधून प्राईम सदस्यांना १० टक्के म्हणजे साधारण १५० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. सेलच्या दिवशी प्राईम सदस्यांना एचडीएफसी बँक डेबिट, क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांसह १० टक्के त्वरित सूट देखील मिळेल. तुम्ही अ‍ॅमेझॉन पे वापरल्यास १००० रुपये कॅशबॅक मिळेल. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून प्राइम डे खरेदीवर प्राइम सदस्यांना ५ टक्के क्रेडिट पॉइंट्स मिळतील.

प्राईम सदस्यांसाठी खास ऑफर

प्राईम सदस्यांना तुफान (हिंदी), मलिक (मल्याळम), इक्काट (कन्नड) यासह अनेक चित्रपटांच्या जागतिक प्रीमियरच्या व्यासपीठावर प्रवेश मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राइम डे छोटे व्यवसाय आणि स्थानिक विक्रेत्यांना समर्पित

अ‍ॅमेझॉन इंडियाचे भारतातील प्रमुख अमित अग्रवाल यांनी अ‍ॅमेझॉन प्राइम डेवर भाष्य करताना सांगितले, “आम्ही हा प्राइम डे अ‍ॅमेझॉन.इन वरील लाखो छोटे व्यवसाय आणि स्थानिक विक्रेत्यांना समर्पित करतो. आम्ही त्यांच्यामुळे आहोत आणि या कठीण काळात त्यांना पुन्हा उभं राहण्याची संधी आम्ही त्यांना देऊ शकतो याचा आम्हाला आनंद आहे. घरच्या घरी सुरक्षिततेतह आपल्याला हव्या त्या वस्तू विकत घेण्याची ही अनोखी संधी तुम्हाला देण्यासाठी आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. ”