Groom and Bride Viral News: लग्न सराईचा सीजन सुरु झाला असून नवरा-बायकोचे भन्नाट किस्से व्हायरल बातम्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर समोर येताना दिसत आहेत. अमेरिकेतील एका कपलची रंजक कहाणीही इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. फ्लोरिडात राहणाऱ्या निकने त्याची पत्नी शायनाला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केलं होतं. मात्र, काही दिवसांनी ती अंगठी टॉयलेटच्या एका पाईपलाईनमध्ये हरवली होती. २१ वर्षांपूर्वी शायनाच्या आईच्या घरी असलेल्या टॉयलेटमध्ये ही अंगठी हरवली होती. त्यावेळी निक आणि शायनाने अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना अंगठी शोधण्यात यश आलं नाही.

दोन दशकानंतर नोव्हेंबर महिन्यात निकच्या आईने टॉयलेटचं बांधकाम करण्यासाठी एका प्लंबरला सांगितलं. त्यानंतर बांधकाम करतना प्लंबरला टॉयलेटमध्ये अडकलेली अंगठी सापडली. एनबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, प्लंबर टॉयलेटचे बांधकाम करत असताना हरवलेली अंगठी त्याला सापडली. त्यानंतर प्लंबरने अंगठी सापडल्याचं शायनाची आई रेनीला सांगितलं. त्यावेळी सापडलेली अंगठी शायनाची असल्याचं रेनीच्या लक्षात आलं आणि तिनं निक आणि शायनाला सरप्राईज द्यायचं ठरवलं. त्यानंतर रेनीने दोघांनाही ख्रिसमस स्पेशल डे साठी विशेष गिफ्ट द्यायचं ठरवलं. निक आणि शायना ख्रिसमस पार्टीसाठी रेनीच्या घरी आल्यानंतर एका ख्रिसमस बॉक्समध्ये ठेवलेली अंगठी त्यांना रेनीने दिली. अंगठी पाहून निक आणि शायनाला आश्चर्याचा धक्का बसला.

नक्की वाचा – Rishabh Pant Car Accident : “ऋषभ लवकर बरा हो”, चाहत्यांनी देवाला घातलं साकडं, ट्विटरवर तमाम क्रिकेटप्रेमींच्या पोस्ट Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकने अंगठी सापडल्यावर म्हटलं, ” आईने एका छोट्या ख्रिसमस बॅगमध्ये अंगठी ठेवली होती. आम्ही ती बॅग उघडल्यानंतर अंगठी सापडल्याचा आमचा आनंद द्विगुणीत झाला. शायनाने ती अगंठी तिची असल्याचं ओळखलं. अंगठी पुन्हा भेटल्याने तिचेही डोळे पाणावले. आता आम्ही या अंगठीचा नवीन अलंकारामध्ये समावेश करणार आहोत. इतक्या वर्षानंतर अंगठी सापडल्याचा आनंद झालाच पण या घटनेतून आम्ही खूप मोठा बोध घेणार आहोत. जेव्ही तुम्ही काही गोष्टी हरवता त्यावेळी टॉयलेटमध्ये जाऊन कानकोपऱ्यात त्यांना शोधाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा.