टिक-टॉक हे अ‍ॅप मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. या प्लॅटफॉर्मवरील वादग्रस्त अकाउंटपासून ते युट्यूबविरुद्ध टिक-टॉकवादापर्यंत आणि नंतर थेट भारत विरुद्ध चीनमधील तणावामुळे टिक-टॉक मागील एका महिन्याहून अधिक काळापासून चर्चेत आहे. अनेकांनी चीनी बनावटीचे या अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. बॅन टिक-टॉकपासून ते अगदी या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी भारतीय पर्याय म्हणून मित्रों नावाचे अ‍ॅप प्ले स्टोअरवर दाखल होण्यापर्यंत अनेक घडामोडी मागील काही आठवड्यांमध्ये घडल्या आहेत. असं असतानाच आता टिक-टॉक पुन्हा चर्चेत आलं आहे ते चक्क भारत सरकारमुळे. एकीकडे भारतीय नेटकरी या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी करत असतानाच थेट भारत सरकारनेच या प्लॅटफॉर्मवर आपले अकाउंट सुरु केलं आहे. त्यामुळे नेटकरीही गोंधळले आहेत.

भारत सरकारने @mygovindia या हॅण्डलसहीत या चीनी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. पदार्पणानंतर अवघ्या काही तासांमध्ये या अकाउंटला ८ लाख ९२ हजारहून अधिक टिक-टॉकर्सने फॉलो केलं आहे. मूळात टिक-टॉक हे चीनमधील ‘बाइट डान्स’ या कंपनीच्या मालकीचे अ‍ॅप आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून या अ‍ॅपविरोधात नेटकऱ्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण झालेले असतानाच चीनी मालालाविरोध करणारी ऑनलाइन मोहीम नेटकऱ्यांनी सुरु केली आहे. याच चीनी मालालाविरोध करण्यासंदर्भातील काही व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आल्याचा आरोप भारतीय टिक-टॉकर्सने केला आहे.

अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर व्हा’ या सूचनेनुसार भारतीय अ‍ॅप वापरत चीनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही केलं होतं.

अशी परिस्थिती असतानाच आता थेट भारत सरकारनेच या प्लॅटफॉर्मवर अधिकृत अकाउंट सुरु केलं आहे.या अकाउंटचे स्क्रीनशॉर्ट आता व्हायरल झाले आहेत.

या अकाउंटवरुन योग अभ्यास आणि करोनासंदर्भातील माहिती पोस्ट केली जात आहे.

@mygovindia##Yoga apnaye, tension ko dur bhagayein. Apna video hamse ##mylifemyyoga pe share karein ##yogachallenge ##yogaposeoriginal sound – mygovindia

@mygovindia##didyouknow :Powerful & high speed, India’s first 12000 HP WAG12B locomotive is a significant addition to ##indianrailway ##makeinindia ##aatmanirbharoriginal sound – mygovindia

एकीकडे भारतीय नेटकरी चीनी सॉफ्टवेअरला विरोध करत असतानाच दुसरीकडे थेट सरकारनेच अशाप्रकारे या प्लॅटफॉर्मवर पदार्पण केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपला बहिष्कार आणि…

सरकारनेच केलं ट्रोल

कारवाई सांगितली तर हेच इथे आले

समर्थकांचं कसं होणार?

अपेक्षा आणि अपेक्षाभंग

यासंदर्भात तुमचे काय मत आहे कमेंट करुन नक्की कळवा.