या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपप्रचारासाठी एखाद्या मोठय़ा कलाकाराच्या छायाचित्राचा वापर करण्याचे प्रकार समाजमाध्यमावर नेहमीच घडत असतात. अशाच एका प्रकरणात ‘बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तोंडी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होईल, असे वाक्य तोंडी टाकण्यात आले आहे, जे अमिताभ यांनी कधी उच्चारलेले नव्हते. ‘‘मी आयसिसचा विरोध करताना मुस्लिमांना कधी पाहिलेले नाही, पण आरएसएसचा विरोध करताना लाखो हिंदूंना पाहिलेले आहे.’’ हे ते वाक्य आहे. परंतु बच्चन यांच्या अधिकृत ‘डिजिटल टीम’ने समाजमाध्यमांवर फिरत असलेले विधान खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan fake news
First published on: 13-04-2018 at 02:26 IST