Video : ‘असा’ साजरा केला अमृता फडणवीस यांनी फ्रेंडशिप डे

नेटीझन्सकडून मिळाल्या संमिश्र प्रतिक्रिया

संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्र्यांची पत्नी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत असते. नुकतीच मराठा आरक्षणावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची राज्यभरात चर्चा सुरु होती. त्यानंतर त्यांनी ‘जागतिक फ्रेंडशिप डे’चे निमित्त साधत पुन्हा एकदा सोशल मीडियावर नेटीझन्सची पसंती मिळवली आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने त्यांनी आपल्या मुलीसोबतचा एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांची मुलगी दिविजा हिला फ्रेंडशिप बँड बांधला. तसेच तिनेही आईला फ्रेंडशिप बँड बांधत सर्वांना हॅप्पी फ्रेंडशिप डे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BmFkNOgjsFn/

अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये मायलेकीचे मैत्रीपूर्ण प्रेम आपल्याला दिसून येत आहे. अवघ्या ५ तासात हा व्हिडियो जवळपास १० हजार जणांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर या दोघींना अनेकींनी फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तर काहींनी राज्यातील मराठा आरक्षणाच्या स्थितीवर लक्ष वेधत राज्यात काय चालले आहे आणि तुम्ही फ्रेंडशिप डे साजरा करत आहात असे म्हणत त्यांच्यावर टीकाही केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amruta fadnavis and divija daughter of devendra fadnavis celebrate friendship day with each other post video on instagram

ताज्या बातम्या