अनेकांना कुत्रा, मांजर, ससे, मासे किंवा पक्षी पाळण्याची आवड असते. त्यांचा ते कुटुंबातल्या एखाद्या सदस्यांप्रमाणे सांभाळ करत असल्याचे आपण अनेकदा पाहतो, ऐकतो. पण कोणी विषारी अजगराचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेला तुम्ही पाहिला आहेत का? कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण चीनमध्ये राहणारे ६८ वर्षांचे वृद्ध शी जीमीन आणि त्यांच्या पत्नीने आपल्या घरात साडेतीन मीटर लांब असलेल्या अजगराला पाळले आहे. या अजगराचा ते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात. शी जीमीन यांच्या घरात ६० किलोचा अजगर आहे. २००९ मध्ये शी यांनी या अजगराला आपल्या घरात आणले होते. एका प्राणी विक्रेत्याला या अजगराचे खूपच ओझे झाले होते. त्यामुळे त्याला मारण्याचा विचार तो करत होता. पण शी यांनी या अजगराला दत्तक घेतले आणि आपल्या मुलासारखा या अजगराचा सांभाळ केला. शी यांच्या घरात अत्यंत सहजतेने हा अजगर वावरतो आणि इतकेच नाही तर शी त्याला बाहेर फिरायलाही घेऊन जातात.
VIRAL : वृद्ध जोडपे अजगराचा करताहेत मुलाप्रमाणे सांभाळ
अजगराला बाहेर फिरायलाही ते घेऊन जातात
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 11-11-2016 at 18:55 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An elderly chinese couple has been raising a 60 kg 3 7 metres long python as their child