उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी पोस्ट केलेले व्हिडिओ आणि फोटोज चांगलेच व्हायरल होत असतात. आनंद महिंद्रा नेटकऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधतात. त्यामुळे नेटकरी त्यांना कायमच मजेशीर प्रश्न विचारत असतात. त्या सर्व प्रश्नांना आनंद महिंद्रा आपल्या शैलीत उत्तरं देतात. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आनंद महिंद्रा एका वर्गात विद्यार्थिनींमध्ये बसलेले दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आनंद महिंद्राच्या फोटोवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच प्रश्नही विचारत आहे. यापैकी काही प्रश्नांना आनंद महिंद्रा यांनी उत्तरं दिली आहेत.

फोटो शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘#NationalYouthDay आपण केवळ तरुण वयच नाही तर मनाने तरुण राहूनही साजरा करतो. आपल्या सभोवतालच्या जगात नवीनता आणि तारुण्य राखणे महत्वाचे आहे. जेव्हा मी आमच्या चिमुकल्यांसह वर्गात जातो तेव्हा मला उर्जा मिळते.” या फोटोनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत आनंद महिंद्रा वर्गात मागच्या बाकावर बसलेले दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया यूजर्स त्यांना बॅकबेंचर म्हणू लागले आहे. यावर उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, ‘बॅकबेंचर्सकडे वर्ग आणि विश्व पाहण्यासाठी नेहमीच उत्कृष्ट दृष्टिकोन असतो.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद महिंद्रा यांनी एखादा फोटो, व्हिडिओ किंवा पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली की त्यावर तात्काळ प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होते. आनंद महिंद्राही कामातून वेळ काढून नेटकऱ्यांना त्यांच्या शैलीत उत्तरं देतात. त्यांचं दिलखुलास वागणं नेटकऱ्यांना आवडते.