तुम्ही आनंद महिंद्रा यांना ओळखलंच असेल. ते महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत आणि देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तुम्हाला माहित असेल की आनंद महिंद्रा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करत राहतात. कधीकधी त्यांच्या मजेदार पोस्ट लोकांना खूप हसवतात तर कधी ते जीवनाशी संबंधित अद्भुत धडे देतात. त्यांना वाहनांची आवड असल्याने ते अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांशी संबंधित व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कोळीसारखी धावणारी कार दिसत आहे. ही अनोखी कार पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हीलचेअरसारखी दिसणारी चारचाकी कार आहे, ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती बसलेला आहे. ही कार कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर सहजतेने फिरताना दिसते. मधोमध खड्डा असो किंवा मग उंच चढण असो, ही अप्रतिम गाडी कोळी चालल्यासारखी प्रत्येक रस्त्यावरून वेगाने धावते. ही कार तुम्ही कुठेही चालवू शकता. मात्र, या कारवर एकच व्यक्ती प्रवास करू शकते. ही इलेक्ट्रिक कार आहे. आनंद महिंद्रा यांना ही कार आवडली आहे. या कारच्या ‘गेट-ग्रेडेशन’ आणि फीचर्सने ते खूपच प्रभावित झाले आहेत. अशी अप्रतिम कार तुम्ही क्वचितच पाहिली असेल, जी कोळीसारखी कुठेही धावू शकते.

आणखी वाचा : वडिलांसोबतचा व्हिडीओ पाहताना भावूक झाला हा चिमुकला, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते; पण हत्तीला कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नेत्रदीपक ‘स्पायडर कार’चा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ‘इंटरेस्टिंग’ असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. “चाके असलेली कोळी….संरक्षण आणि निमलष्करी दलाच्या जवानांना याचा खूप उपयोग होऊ शकतो.” असं देखील त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिलंय. दोन मिनिट २० सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाईक देखील केलं आहे. लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘मुंबई आणि ठाण्याच्या रस्त्यांसाठी ती परफेक्ट आहे’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘मला बेंगळुरूच्या रस्त्यांवरून प्रवासासाठी ही कार कोणत्याही किंमतीत खरेदी करायची आहे’.