सोशल मीडियावर सक्रिय असणारे आनंद महिंद्रा हे नेहमीच देशातील सर्जनशील व्यक्तींचं  कौतुक करतात. सर्जनशील व्यक्तींविषयी आदर आणि आपुलकी असलेले आनंद महिंद्रा अशा व्यक्तीचे व्हिडिओ, फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट करून त्यांना ओळख मिळवून देतात. व्हायरल झालेल्या एखाद्या पोस्टमधल्या व्यक्तींची ‘डोकॅलिटी’ त्यांना आवडली की त्या व्यक्तीचा पत्ता शोधून ते स्वत:हून त्याला मदत करतात. अशी कितीतरी उदाहरण आपण पाहिली असतील. काही महिन्यांपूर्वी चप्पला दुरुस्त करण्याचा व्यवसाय असणाऱ्या एका व्यक्तीची हटके जाहिरातबाजी त्यांना एवढी आवडली होती की त्यांनी या व्यक्तीचा पत्ता शोधण्यासाठी आपल्या चमूला कामाला लावलं होतं. इतकंच नाही तर त्यासाठी छोटं दुकानही तयार करून द्यायची तयारी दर्शवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर आता व्हॉटस् अॅपवर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे ते चांगेलच प्रभावित झाले आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘वन मॅन बँड’ असं नाव त्यांनी या व्यक्तीला दिलं आहे. पाठीवर ड्रम, हातात गिटार आणि एका हातात माऊथ ऑर्गन ही तिन्ही वाद्य तो एकाच वेळी वाजवतो. तिन्ही वाद्य वाजवताना त्यानं जो ताळमेळ साधलाय तो तर कमालीचा आहे. त्याचं हे कौशल्य पाहून आनंद महिंद्रा यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ही व्यक्ती कोण आहे मला माहिती नाही पण ईशान्येकडील एखाद्या राज्यातला तो असावा असं त्यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर तो प्रत्यक्षात भेटला तर नक्कीच पुरस्कार देऊन त्याचा मी गौरव करेन असंही ते म्हणाले.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra want to give award for this innovative one man band
First published on: 13-06-2018 at 10:57 IST