डोकं फिरलं की नवरा काय करेल याचा नेम नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ . आता नव-याचे डोकं फिरण्याच कारण तसं मोठंच होतं म्हणा पण याचा वचपा काढण्यासाठी त्याने जे काही केलं ते फारच गंमतीशीर होतं.

सुपरमार्केटमध्ये एक स्पर्धा सुरू होती, जे ग्राहक आपले आडनाव बदलून दुकानाचे नाव ठेवतीत त्यांना जवळपास ५७ हजार रुपये देण्यात येईल अशी ही स्पर्धा होती. तेव्हा एका विवाहित महिलेने आपले अधिकृतरित्या आडनाव बदलले आणि बक्षिस जिंकले. आता काही पैशांसाठी बायकोनं आपलं नाव बदलेलं पाहून नव-याची अशी काही सटकली की त्याने याचा पुरेपुर बदला घेत आपला राग शांत केला. त्याच्या बायकोची गाडी सुपरमार्केटच्या बाहेर पार्क केली होती, तो शेजारी उभा असलेला सिंमेट मिक्सर घेऊन घेऊन आला. ओलं सिमेटं क्राँकिटचे मिश्रण तिच्या गाडीत ओतलं. गाडी सिमेंटने पुरेपुर भरून गेली तेव्हा कुठे त्याच्या आत्म्याला शांती मिळाली. रशियातला हा व्हिडिओ असल्याचे समजते आहे. या व्यक्तीचे आपल्या पत्नीबरोबरचे वैवाहिक संबध आधीच ताणले होते, याच रागातून तिने आपले नाव बदलले. पण आपला नवरा असा काही वेडपणा करेल याची कल्पना तिने स्वप्नातही केली नसेल. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत २० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता.

काही महिन्यांपूर्वी अशाच एका वेड्या नव-याने आपल्या बायकोचा वचपा काढण्यासाठी तिचा फोटो ऑनलाइन ट्रेडिंग साईटवर टाकला होता. आपली पत्नी कटकटी असल्याने तिला आपण विकायला काढतो असे म्हणत त्याने तिचे फोटो अपलोड होते नंतर या पत्नीने संबधीत संकेतस्थळाशी संपर्क साधून हे फोटो काढून टाकायला सांगितले होते.