आज ‘जागतिक बकरा दिन’ अर्थात एक एप्रिल किंवा एप्रिल फूल. या दिवशी कोणताही बकरा किंवा बकरी पकडून त्यांना मूर्ख बनवायची सगळीकडे शर्यत लागते. एकंदरीत ‘बुरा न मानो होली है’चा माहौल सगळीकडे असतो. एप्रिल फूलचा दिवस तसा ‘महत्त्वाचा’ असला तरी या दिवशी बँक हाॅलिडे नसतो. या दिवशी घरी राहणाऱ्यांकडे दुसऱ्यांना मूर्ख बनवायला कितीतरी पर्याय असतात. पण या दिवशी आॅफिसमध्ये असणाऱ्यांवी काय करायचं बुवा! तर सादर करत आहोत आॅफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांना मूर्ख बनवायचे काही प्रॅंक्स…

१. खुर्चीखाली हाॅर्न

तुमच्या सहकाऱ्यांच्या खुर्चीच्या खाली हाॅर्न लावून तुमच्या सहकाऱ्याची भंबेरी तुम्ही उडवू शकता. चित्रात दाखवल्याप्रमाणे आॅफिस चेअरच्या खाली हा हाॅर्न लावून ठेवला की तुमचा सहकारी या खुर्चीवर बसल्यावर ही खुर्ची थोडी दबली जात त्याखालचा हाॅर्न मोठठ्याने वाजेल. आणि यानंतर तुमच्या सहकाऱ्याचा चेहरा पाहण्यालायक झालेला असेल. हे असे हाॅर्न बाजारात सहजपणे उपलब्ध असतात.

२. दरवाज्याच्या मागे हाॅर्न

सगळ्याच आॅफिसेसमध्ये या आधीच्या चित्रात दाखवली आहे तशा खुर्च्या नसतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमच्या सहकाऱ्याची खेचायची असेल तर तुम्ही चित्रात दाखवल्याप्रमाणे दरवाज्याच्या मागे हा हाॅर्न लावू शकता. तुमच्या ‘बकऱ्याने’ दरवाजा उघडला की हाॅर्व मोठ्याने वाजलाच म्हणून समजा.

३. उंदीरच उंदीर

खरोखरचा दिसणारा खोटा उंदीरही बाजारात सहजपण मिळतो. असे किती उंदीर विकत घेत तुमच्या सहकाऱ्यांना कशा प्रकारे घाबरवायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचंय.

५. सापाचा प्रँक

आता उंदीर झाला की साप तर येणारच. खेळण्यातला साप चित्रातल्याप्रमाणे योग्य रीतीने ठेवत तुन्ही आॅफिसमध्ये कोणाचीही भंबेरी उडवू शकता.

६. किडेही यात मदत करु ठकतात…

चित्रात दाखवला आहे तसा लँप आॅफिसमध्ये असण्याची शक्यता कमी आहे. पण असेखे खेळण्यातले किडे घेऊन वाटेल ते प्रँक्स करू शकता.आता यानंतर तुमची कल्पनाशक्ती ताणून आणखी प्रँक्स करू शकता. फक्त एप्रिल फूलच्या गडबडीत मस्करीची कुस्करी होणार नाही याची काळजी घ्या.

७. काँप्युटर माऊस

खऱ्या उंदराच प्रँक झाल्यावर काँप्युटरच्या माऊस घेऊनसुध्दा तुम्ही तुमच्या सहकाऱ्याला त्रास देऊ शकता. त्याच्या किंवा तिच्या आॅप्टिकल माऊसच्या खाली एखादा कागदाचा तुकडा चिकटवला की तो माऊस कागद काढल्याशिवाय चालणारच नाही.

८. स्मार्टफोन प्रॅंक

तुमच्या सहकाऱ्याच्या स्मार्टफोन घेतही तुम्ही त्याला फूल बनवू शकता. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय. त्याचा फोन घेऊन त्याच्या होमपेजवरची सगळी अॅप्स काढून टाका ( uninstall करू नका). अॅप्स काढण्यापूर्वी त्याच्या होमपेजचा स्क्रीनशाॅट घ्या. आता ही अॅप्स होमपेजवरून काढल्यानंतर हा स्क्रीनशाॅट त्याच्या फोनचा वाॅलपेपर म्हणून लावा. तुमच्या सहकाऱ्याला अॅपचे आयकाॅन तर दिसतील. पण त्याने कितीही प्रयत्न केले तरी ती अॅप्स ओपन होणार नाहीत कारण फक्त अॅप्सचं चित्र असणारा वाॅलपेपर असणार आहे. द्या टाळी!

९. स्मार्टफोन प्रँक पण काँप्युटरसोबत 

वर दिलेला प्रँक तुम्ही तुमच्या सहकाऱ्याच्या काँप्युटर बरोबरही करू शकता. यासाठी त्याच्या काँप्युटरच्या होमपेजवर जात ctrl+ prt sc ( प्रिंट स्क्रीन) ही बटणं दाबा. त्यानंतर त्याच्या होमपेजवरचे सगळे आयकाॅन्स काढून टाका. प्रिंट स्क्रीनवरची इमेज paint मध्ये ओपन करून सेव्ह करा आणि ती इमेज त्याच्या होमपेजवरचा वाॅलपेपर म्हणून ठेवा.

१०.  Push, Pull दरवाजा

आॅफिसमधल्या अनेक दरवाज्यांवरती ते जसे उघडले जातात तसं ‘ढकला’ (पुश) किंवा ‘ओढा’ (पुल) असे लिहिलेलं असतं. तुमच्या सहकाऱ्याची धमाल करायची असेल तर अशा दारांवर बरोबर उलट्या सूचना लिहा, आणि तुमच्या सहकाऱ्याची उडणारी धांदल पहा.