आपल्याला सगळे अवयव चांगले असल्याने अनेकदा त्याची किंमत कळत नाही. पण ज्यांना हे अवयव नाहीत त्यांना मात्र त्याची किंमत कळल्यावाचून राहत नाही. हेअरस्टाईल करण्यासाठी हातांची तर आवश्यकता असणारच. पण एक असा व्यक्ती आहे जो हात नसतानाही अतिशय उत्तम अशा हेअरस्टाईल करु शकतो. या तरुणाचे नाव आहे गॅबरल हिरेडिया. त्याला कोपराच्या खालचे दोन्ही हात नसूनही तो वेगवेगळ्या हेअरस्टाईल अतिशय चांगल्या पद्धतीने करु शकतो. आपल्याकडे केस कापण्यासाठी लोकांना सुरुवातीला काही प्रमाणात भिती वाटायची मात्र मी करत असलेली हेअरस्टाईसल पाहून ग्राहकांचा माझ्यावरील विश्वास वाढला.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अतिशय अवघड वाटणाऱ्या आणि फॅशनेबल हेअरस्टाईल अतिशय सहज करतो. त्याचे ग्राहकही त्याच्याशी इमानदार असल्याचे त्याने सांगितले. जन्मापासून असणाऱ्या या व्यंगावर गॅबरलने अतिशय उत्तम पद्धतीने मात केली असून आता तो प्रोफेशनल हेअरड्रेसर म्हणून काम करत आहे. अर्जेंटीनाची राजधानी ब्युनोस एरर्स याठिकाणी त्याचे सलून आहे. आपल्याला कुटुंबियांचा आणि मित्रमंडळींचा चांगला पाठिंबा मिळाल्याने आपण हे करु शकलो असे गॅबरल सांगतो. सुरुवातीला मला केस कापण्याबाबत उत्सुकता असल्याने माझा भाऊ आणि मित्र यांचे केस कापून पाहीले. हे करताना मला मजा आली. मग मी हे काम सुरुच ठेवले आणि दरवेळी यामध्ये सुधारणा होत गेली. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या कमतरतांवर मात करुन आपण पुढे जायला हवे असा सकारात्मक संदेशही तो देतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.