सर्वेक्षणावर विश्वास ठेवून एका डेअरी कंपनीने भलेमोठे कर्ज काढून मोठ्या प्रमाणात चीझचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. पण, कंपनीचे चीज काही केल्या विकले जाईना. शेवटी दिवाळखोरीत निघालेल्या या कंपनीकडे आपल्या कर्मचा-यांचे पगार देण्याएवढेही पैसे नाहीत. त्यामुळे, या कंपनीने आपल्या कर्मचा-यांच्या हातावर पैश्यांऐवजी चीज टेकवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा : राहुल गांधींच्या आरोपानंतर ट्विटरवर ‘#थरथर_मोदी’ हॅशटॅग ट्रेंडमध्ये
आर्मेनियामधील ‘The Ashtarak Kat Company’ ही डेअरी कंपनी दिवाळखोरीत निघाली. एका सर्वेक्षणावर विश्वास ठेवून या कंपनीने मोठ्या प्रमाणत ब्ल्यू चीजचे उत्पादन घ्यायला सुरूवात केली. आपल्या देशात चीजची मागणी मोठी आहे. तसेच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे चीज खायला खूपच आवडते. तेव्हा आपण मोठ्या प्रमाणत चीजचे उत्पादन घ्यायला सुरूवात केली तर कंपनी नक्कीच फायद्यात जाईल असा विचार या कंपनीने केला. त्यासाठी बँकेतून भलेमोठे कर्जही या कंपनीने काढले. मोठ्या प्रमाणात ब्ल्यू चीजचे उत्पादनही घेतले.
वाचा : कॅमेरूनच्या मंत्र्यांनी राष्ट्रपतींना केलेला ‘मुजरा’ सोशल मीडियावर व्हायरल
पण समस्या अशी होती की हे चीज घ्यायला कोणी ग्राहकच त्यांना मिळेना. इतकेच नाही तर चीजचा हा प्रकार आर्मेनियन लोकांच्या फारश्या पसंतीसही उतरला नाही. त्यामुळे जवळपास ६० टन चीज या कंपनीत पडून आहे. या सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे कंपनीला इतके महागात पडले की ही कंपनी चक्क दिवाळखोरीत निघाली. बँकेचेच काय पण आपल्या कर्मचा-यांचे पगार देण्याइतकेही पैसे या कंपनीकडे नाहीत. म्हणूनच, कर्जाच्या बदल्यात या कंपनीने चीज देण्याचे ठरवले आहे.