Asia Cup 2022: UAE मध्ये आशिया चषकाची लढाई सुरू झाली आहे. रविवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट राखून पराभव करत शानदार विजय संपादन केला. पाकिस्तानचा स्कोअर १९.४ षटकांत १४७ धावांवर पार केल्यानंतर भारताने यूएईच्या मैदानावर त्याचा बदला घेतला. भारताकडून विराट कोहली, जडेजाची खेळी उत्कृष्ट होती, पण हार्दिक पांड्याने ३३ धावा करत सामना पुन्हा भारताच्या कुशीत आणला. दरम्यान, सामना जिंकतेवेळी पांड्याने लगवलेल्या षटकारमुळे खुश होत, अफगाणिस्तानच्या एका तरुणाने हार्दिक पांड्याचे चुंबन घेतल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जेव्हा तरुणाने हार्दिक पांड्याला टीव्हीवर किस करायला सुरुवात केली

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सामाना रंगला असतानाच, अफगाणिस्तानचा एक तरुण टीव्हीजवळ येतो हार्दिक पांड्याला किस करून जातो. वास्तविक, हा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा हार्दिक पांड्या षटकार मारून सामना संपवतो. यादरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये उपस्थित लोक आनंद साजरा करण्यास सुरुवात करतात.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

( हे ही वाचा: Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांचा नितीन गडकरींना थेट सवाल; मी बोगद्यातून जाणं पसंत करेन पण…)

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

( हे ही वाचा: पंजाबच्या पठ्ठ्याने जिंकला गिनीज वर्ल्ड बुक रिकॉर्ड! कधीही जिममध्ये न जाता एका मिनिटात मारल्या सर्वाधिक ‘क्लॅप पुशअप’)

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत खूप व्ह्यूज मिळाले असून, हा व्हिडीओ झपाटयाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अनेकजण यावर आपली प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत.