Baby elephant dance viral: सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे खरंच अचंबित करणारे असतात. तुम्ही कधी हत्तीच्या पिल्लाला एका साचेबद्ध पद्धतीने आणि अगदी अचूक तालावर नाचताना पाहिलंय का? नाही ना… मग हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहा. सध्या अशाच एका छोट्या हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हत्ती म्हणजे खरं तर खूप मोठा प्राणी आणि तो एखाद्या चालीवर ठेका धरत असेल, तर मग हा व्हिडीओ गाजणारच. या व्हिडीओमध्ये हा हत्ती चक्क एका भजनाच्या तालावर नाचताना दिसत आहे. केरळ राज्यातील गुरूवायूर मंदिराने हे हत्तीचं पिल्लू एका दुसऱ्या मंदिरात पाठवण्यात आलं आहे. तिथे तो काही लोक गात असलेल्या भजनावर ठेका धरत असल्याचे दिसते. या व्हिडीओतून जाणवतं की हा हत्ती स्वत:देखील तितक्याच उत्साहाने नाचत आहे.
मंदिराच्या आवारात हत्तीचा डान्स
तमिळनाडूतील थुथुकुडी जिल्ह्यातील थेरूचेंदूर मंदिराला हे हत्तीचं पिल्लू पाठवण्यात आलं आहे. दक्षिण भागात कोणत्याही धार्मिक कार्यात किंवा सणासुदीला हत्तींची उपस्थिती आवर्जून असते. त्यांना तितकंच महत्त्वही दिलं जातं.
अनेक जण आवडत्या प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनेकदा ते खेळत असतात किंवा माणसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात.
या व्हिडीओला लोकांनीही मोठ्या प्रमाणात कमेंट्स दिल्या आहेत. हे हत्तीचं पिल्लू किती छान नाचत आहे असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. नाचण्याचा हा ठेका त्याच्यात आधीपासून असावा अशी कमेंट एका नेटकऱ्याने दिली आहे; तर काहींनी हत्तीच्या या डान्सला तो स्ट्रेस रिलीज करत असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारे काही प्राणी आपल्याला होत असलेला त्रास दाखवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. शिवाय काहींनी त्याच्या बाजूला एक मुलगा सारखाच डान्स करत असल्याचे कमेंट्समध्ये सांगितले आहे. एका नेटकऱ्याने तर लिहिलं आहे की हे हत्तीचं पिल्लू तर माझ्यापेक्षाही छान नाचत आहे. हा व्हिडीओ न्यूजमित्रा या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. गणपतीच्या दिवसात हा व्हिडीओ आल्याने तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.