Viral Video :- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण दररोज बघतो. यात अनेक लहान मुलांचे निरागस व्हिडीओ असतात, जे अनेकांच्या मनात घर करून जातात. घरात लहान मुलं असली की तुमचा वेळ कधी निघून जाईल हे तुम्हालासुद्धा कळणार नाही. लहान मुलांसोबत खेळणे, त्यांच्यासोबत मस्ती करणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे नकळत अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जातात; तर असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका चिमुकलीचा तिच्या बाबा आणि काकांना ओळखण्यात गोंधळ होत आहे. आणि हा गोंधळ का होतो आहे ? याचं कारणही तसंच मजेदार आहे.

तर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिमुकलीचे बाबा व काका हे जुळे भाऊ आहेत. आणि हे जुळे भाऊ एकमेकांसमोर उभे आहेत. आणि जुळ्या भावांपैकी एकाच्या हातात ही गोंडस लहानशी मुलगी आहे. बाबा आणि काका एकसारखे दिसत असल्यामुळे चिमुकलीची बाबांना ओळखण्यात गडबड होते आहे. नक्की तिचे बाबा कोण आहेत? हे चिमुकलीला कळायला काही मार्गच नाही आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका जुळ्या भावाने, मी तुझा बाबा आहे असं म्हणताच चिमुकली चेहरा बघून एकदा बाबांकडे जाते, तर दुसऱ्या जुळ्या भावाने आवाज दिला की ती निरागसपणे काकांकडे जाते. आपले वडील आहेत असं समजून चिमुकली तिच्या बाबांकडून-काकांकडे तर काकांकडून-बाबांकडे अशी सतत ये-जा करताना दिसत आहे. आणि खास गोष्ट अशी की, या दरम्यान चिमुकलीचा उडणारा गोंधळ आणि तिचे हावभाव तुम्हाला देखील पोट धरून हसायला नक्कीच भाग पाडेल.

हेही वाचा :- मुंबईत दिसली जलपरी! ‘वरळी सी लिंक’ ते ‘गेटवे ऑफ इंडिया’ एका दमात पोहली, ३६ किमीचं अंतर केलं पार, पाहा VIDEO

नक्की बघा हा व्हिडिओ :-

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ तुम्हालाही विचारात पाडेल की, नक्की या चिमुकलीचे बाबा आहेत तरी कोण? हा मजेशीर क्षण इन्स्टाग्राम ॲपच्या व्हायरल हॉग (Viral Hog) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ अनेकांना आवडला असून नेटकरी मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणतोय की, या चिमुकलीचे बाबा नक्की कोण आहेत हे फक्त तिची आईचं सांगू शकते; तर अनेकांना निरागस मुलीचा गोंधळ पाहून हसू आवरत नाहीये. जुळ्या भावांमध्ये आपल्या बाबांना शोधणाऱ्या या निरागस चिमुकलीचा व्हिडीओ तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच आनंद देऊन जाईल.