scorecardresearch

‘Badhaai Do’ गाण्यावर इवल्याश्या चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ या चित्रपटाचं टायटल ट्रॅकची क्रेझ सोशल मीडियावर प्रचंड वाढलीय. लोकांना आपल्या तालावर नाचण्यासाठी भाग पाडणारं हे गाणं लोकांना खूपच आवडू लागलंय. सध्या याच गाण्यावर इवल्याश्या चिमुकलीने अप्रतिम डान्स केलाय.

Badhaai-Do-Viral-Video
(Photo: Instagram/ tania_and_sony)

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ या चित्रपटाचं टायटल ट्रॅकची क्रेझ सोशल मीडियावर प्रचंड वाढलीय. हे गाणं ऐकायला खूप छान वाटतं. हे गाणं प्रत्येकालाच त्याच्या तालावर नाचवण्यास भाग पाडत आहे. या गाण्यात राजकुमार रावचा अजब डान्स पाहायला मिळणार आहे. लग्नाचा सूट बूट घालून तो अतिशय देसी स्टाइलमध्ये डान्स करत आहे. हे गाणं लोकांना खूपच आवडू लागलंय. प्रत्येक जण आता या गाण्यावर आपआपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहेत. सध्या या गाण्यावर एका चिमुकलीचा डान्स प्रचंड व्हायरल होतोय. आज तुमचा मूड कसाही असला तरी या व्हिडीओमधल्या चिमुकलीचा डान्स पाहून तुम्ही आनंदी व्हाल हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधल्या चिमुकलीचे डान्स मूव्ह्स पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. या इवल्याश्या चिमुकलीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकुळ घातलाय. तिच्या या वयात क्वचितच कुणाला इतका परफेक्ट डान्स जमला असता.

आणखी वाचा : बसमध्ये घुसून महिलेनं ड्रायव्हरला केलेल्या मारहाणीचा VIDEO VIRAL

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर या चिमुकलीने जबरदस्त डान्स केला आहे. तिचा डान्स इतका अप्रतिम आहे की तुम्हाला व्हिडीओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करायला भाग पडेल.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : विमानात झाली भल्यामोठ्या सापाची एन्ट्री अन् करावी लागली इमर्जन्सी लॅंडिंग

डान्स करताना या चिमुरडीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि प्रत्येक हालचाल पाहण्यासारखी आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, ‘बधाई दो’ चा टायटल ट्रॅक मागे टीव्हीवर सुरू आहे आणि त्यासमोर लाल रंगाचा लेहेंगा परिधान केलेली एक छोटी मुलगी डान्स करताना दिसून येत आहेत. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर ज्या स्टेप्स करत आहेत त्याच स्टेप्स ती फॉलो करताना दिसून येत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नातेच उठले जीवावर, संपत्तीच्या वादावरून भर रस्त्यात दोन कुटुंबांमध्ये लाथा, बुक्क्या आणि लाठ्यांनी हाणामारी

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : KISS DAY 2022 : ५८ तास, ३५ मिनिटे आणि ५८ सेकंदापर्यंत ‘किस’ करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत ४० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर व्हिडीओला ३१३४ लाईक्सही मिळाले आहेत. हा व्हिडीओ केवळ प्रचंड शेअर होत नाहीये तर त्यावर अनेक कमेंट्सही येत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमधल्या चिमुकलीचं नाव ‘तान्या’ असं असून ती सतत तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यापूर्वीही या मुलीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोकांना या मुलीच्या डान्सचे वेड लागले आहे. सोशल मीडियावर तान्याच्या फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Badhaai do girl dance viral video kids trending video prp