अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी फक्त काहीच दिवस राहिले आहेत त्यामुळे रिपब्लिकन विरुद्ध ड्रेमोक्रेटिक असे आरोप प्रत्यारोप तर होतच राहणार पण या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टिका करताना सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ चा दाखला देत ओबामा यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे. जर फोनमध्ये वायरस गेला तर मोबाईल कंपनी नवे सॉफ्टवेअर आणून फोन अपग्रेड करते म्हणजे समस्या तिथेच सुटते. तर फोन अचानक पेट घ्यायला लागले की कंपनी उपाय शोधण्याऐवजी फोनचे उत्पादनच बंद करते असा टोला त्यांनी सॅमसंगला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध हिलेरी क्लिंटन अशी लढत सुरु आहे. अनेक वादग्रस्त व्यक्तव्य करत डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेत आहेत तेव्हा ट्रम्प यांना चिमटा काढण्यासाठी एका कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या भाषणात ओबामा यांनी ट्रम्प आणि सॅमसंगचा अडचणीत सापडेला नोट ७ यांची तुलना करत ट्रम्प कसे चुकीचे आहे पटवून दिले आहे. ‘स्मार्ट फोनमध्ये वायरस गेला की फोन अपग्रेट करून ती समस्या सोडवता येते. म्हणजे या प्रकरणात आपण फोन फेकून देत नाही, पण फोनला आग लागायला सुरूवात झाली की मात्र आपल्याला ते फोन वापरणे बंद करावे लागते. कंपनी सुद्धा अशा सदोष उत्पादनाचे उत्पादन बंद करते. त्यामुळे असे पेट घेणारे फोन वापरणे मुर्खपणाचे आहे. तसेच ट्रम्प यांच्या बाबतीतही आहे. जर ते निवडुन तर आपली फोन सारखीच गती होईल’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सॅमसंगने गाजावाजा करत गॅलेक्सी नोट ७ फोन बाजारात आणला होता पण सदोष बॅटरीमुळे ही कंपनी चांगलीच गोत्यात आली होती. बॅटरीमध्ये दोष असल्याने या फोनचा स्फोट होतो त्यामुळे सॅमसंगने हे फोन परत मागवले होते. तर काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी देखील सॅमसंगवर टीका केली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barak obama make a fun of samsung note
First published on: 21-10-2016 at 14:06 IST