आपण इतके फेसबुक अॅडिक्टेड झालोय की प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचे अपडेट्स फेसबुकवर अपलोड करण्याची वाईट सवय आपल्याला असते. म्हणजे बघा ना आपण कुठे जेवायाला गेलो, कुठे चेक इन केलंय अशा छोट्या मोठ्या गोष्टीची माहिती आपण फेसबुकवर शेअर करतो पण याच सवयीमुळे बंगळुरुमधले सूर्यनारायण हे ब्रोकर अडचणीत आले आहेत. त्यांच्या घरी पूजा होती, या पूजेचा फोटो त्यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली नसतील तर नवलच, कारण सूर्यनारायण यांनी पूजेसाठी अक्षरश: नोटांच्या बंडलाची रास मांडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही रक्कम काही थोडीथोडकी नसून ती जवळपास ८५ लाखांहूनही अधिक होती. त्याचप्रमाणे देव्हारा सजवण्यासाठी त्यांनी दीड किलो सोनंही वापरलं होतं. आपल्या पत्नीसोबत पूजा करतानाचा फोटो त्यांनी फेसबुकवर अपलोड केला आणि नेमक्या याच फोटोमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सूर्यनारायण यांनी देवीच्या मूर्तीभोवती केलेली नोटांच्या बंडलांची आरास पाहून कोणालाही धक्का बसेल. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जातंय. एवढी संपत्ती तिही रोख रक्कमेच्या रुपात त्यांच्याकडे आली कशी यावर चर्चा सुरू आहे. पण आपण मात्र पूजेसाठी ही रक्कम बँकेतून काढली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच आपण यावर्षी १३ लाख आयकरही भरला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru broker offers rs 88 lakh in a pooja show off wealth on facebook
First published on: 10-08-2017 at 14:45 IST