viral Video: एखादं मातीचं भांडं जसा कामगार घडवतो, अगदी त्याचप्रमाणे एक शिक्षिका त्या प्रत्येक विद्यार्थांना घडवत असते. शिक्षिका अभ्यासाची ओढ, संस्कार, आदर यांची भावना त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात उमटवत असते. याचबरोबर शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेता काही खास उपक्रम सुद्धा राबवत असतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीस पाहायला मिळालं आहे. शिक्षकांनी वर्गाचे तलावात (स्विमिंग पूल) रूपांतर केलं आहे.

उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील महानपूर उमरदा शाळेत हा खास उपक्रम राबवण्यात आला आहे. शिक्षकांनी वर्गाचे कृत्रिम तलावात रूपांतर केलं आहे. तसेच वर्गातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या खास तलावात (स्विमिंग पूल) एकमेकांवर पाणी उडवून, तर काही जण पोहून मनोसक्त भिजण्याचा आनंद लुटत खेळताना दिसत आहेत. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…प्रसिद्धीसाठी कायपण! गाड्या येत असताना ‘तो’ खुर्ची टाकून बसला रस्त्यावर; पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, वर्गातील शिक्षिकेची टेबल, खुर्ची काढून टाकण्यात आल्या आहेत आणि पूर्ण वर्ग रिकामे करून त्यात पाणी टाकलं आहे. तसेच सांगण्यात येत आहे की, शिक्षकांनी मुलांच्या मागणीनुसार वर्गात कृत्रिम जलतरण तलाव कक्ष तयार केला ; ज्याचा मुलांनी खूप आनंद घेतला आहे असे तुम्हाला व्हिडीओत दिसून येईल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ऑल इंडिया रेडिओने @ airnewsalerts त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व कॅप्शनमध्ये व्हिडीओसंबंधित माहिती दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांना शिक्षकांनी केलेला हा उपक्रम पसंतीस पडत आहे तर अनेक जण त्यांच्या काही अशा बालपणीच्या आठवणी कमेंटमध्ये शेअर करत आहेत.