सध्या सोशल मीडियावर अनेक पशु-पक्षांचे अपघाती जीव गेल्याचे व्हिडीओ आपण पाहत असतो. कधीकधी शुल्लक कारणामुळे पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. मात्र, काही पशुप्रेमी संकटात सापडलेल्या पक्ष्यांना जीवदान देत असतात. प्रसंगी आपला जीव संकटात टाकून ते पक्ष्यांची मदत करत असतात. सध्या अशाच एका पशुप्रेमी वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो विजेच्या खांबावर चढून एका कबुतराचे प्राण वाचवताना दिसत आहे. पोलिसाच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- Video: डोक्यावर चार गोळ्या लागूनही कुत्रीचा जीव वाचला, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

विजेच्या खांबावर चढणं अत्यंत धोकादायक काम आहे. कारण मोठंमोठ्या टॉवर्समधून हजारो व्होल्ट वीजेचा प्रवाह जात असतो. त्यामुळे चुकून जरी आपण अशा विजेच्या तारेला स्पर्श केला तर क्षणात आपण मृत्यूमुखी पडू शकतो. मात्र, बंगळुरुमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता विचेच्या उंच खांबावर चढूव एका पक्षाला जीवदान दिलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही पाहा- Video: विद्यार्थ्याने पेपरमध्ये उत्तराऐवजी लिहिली चक्क अली जफरची गाणी; शिक्षक म्हणाले “आंधळा…”

बंगळुरू वाहतूक पोलिस उपायुक्त कुलदीप कुमार जैन यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. सुरेश असं पक्ष्याला वाचवणाऱ्या वाहतूक पोलिसांचे नाव आहे. IPS कुलदीप कुमार जैन यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “पोलिस कर्मचाऱ्यांमधील प्रतिभा दिसून आली, शाब्बास सुरेश.”

टॉवरमध्ये अडकले होते कबुतर –

व्हिडीओमध्ये विजेच्या टॉवरमध्ये एक कबूतर अडकल्याचे दिसत आहे. कबुतराच्या पायाला धाग्यासारखे काहीतरी अडकले होते, ज्यामुळे त्याला उडता येत नव्हतं. कबुतराने तेथून उडून जाण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, ते अपयशी ठरले. दरम्यान, या कबुतराची अवस्था सुरेशने पाहिल्यावर त्याने कबुतराला मदत करण्याचं ठरवलं आणि कोणत्याही सुरक्षिततेशिवाय सुरेश विजेच्या टॉवरवर चढला. त्याने कबुतराच्या पायात अडकलेला धागा काढताच तो कबुतर उडून गेलं.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सुरेशच्या धाडसाचं कौतुक केलं. मात्र, अनेकांनी पोलिसांकडे सुरक्षेची साधने नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मदत करताना सुरेशचा हात किंवा पाय घसरला असता तर तो स्वत:ही अपघाताचा बळी ठरू शकला असता , अशा कमेंटही नेटकरी व्हिडीओवर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru traffic policeman risked his own life to save a bird video of him climbing an electricity tower went viral jap
First published on: 03-01-2023 at 16:47 IST