नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळ्यात जास्त भाव खाऊन गेली ती सोनम गुप्ता. ती कोण? मुळची कुठली? तिची पार्श्वभूमी काय? याची कोणतीच कल्पना नाही. पण या बिचारीच्या नावापुढे ‘बेवफा’ हा शब्द आला अन् तिचे नाव सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही वर्षांपूर्वी अनेक नोटांवर ‘सोनम गुप्त बेवफा है’ असे लिहिलेले होते. या नोटांच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला. पण नोटाबंदीनंतर नवीन आलेल्या नोटेवर देखील ‘सोनम गुप्ता बेवफा है’ हाच संदेश पाहायला मिळाला. विशेष म्हणजे नवी नोट आल्यानंतर एक दिवसांत हा प्रकार समोर आला. आता ही भारतभर गाजलेली सोनम गुप्ता गुगल सर्चच्या यादीत तिस-या क्रमांकावर आहे.

IIT च्या प्रश्नपत्रिकेपर्यंत पोहोचली ‘बेवफा’ सोनम

गुगलने बुधवारी २०१६ मधली ‘टॉप १० पर्सनालिटी’ची यादी जाहिर केली. या यादीतील व्यक्तीबद्दल गुगलवर अधिक प्रमाणात माहिती शोधण्यात आली. या यादीत आतापर्यंत माहितीही नसलेली सोनम गुप्ता तिस-या स्थानावर आहे. नोटाबंदीनंतर सोनम गुप्ताचे चर्चे इतके होते की आयआयटीच्या प्रश्नपत्रिकेवर देखील तिच्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. क्रिकेट मैदानावर देखील तिच्या बेवाफाईचे चर्चे रंगले होते. गुगलच्या सर्च यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी. व्ही. सिंधु दुस-या क्रमांवर पाहायला मिळाली. या खालोखाल सोनम गुप्ता तिस-या क्रमांकावर असून दीपा कर्माकर चौथ्या स्थानावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.