आजकाल कॅशलेस पेमेंटचा ट्रेण्ड आहे. पेटीएम, गुगल पे, फोनपे (Paytm, Google Pay, PhonePe) सारख्या पेमेंट अॅप्ससह ऑनलाइन व्यवहार खूप सोपे झाले आहेत. मात्र, त्यांचा ट्रेण्ड वाढल्याने आता त्यात फसवणूकही वाढू लागली आहे. अशा ऑनलाइन पेमेंट अॅप्सच्या वाढत्या वापरामुळे फसवणूक करणारे लोक सहज फसवू शकतात. अशी अनेक प्रकरणे रोजच चर्चेत असतात.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एका महिलेला दुकानदाराने रंगेहात पकडले होते. ही महिला लोकांची फसवणूक करण्यासाठी पेटीएम अॅपचा वापर करत होती. पेटीएमसारखे दिसणारे, हे ‘पेटीएम स्पूफ’ (Paytm Spoof) ऑनलाइन पेमेंट अॅपची नक्कल करते. येथे एक व्हिडीओ देखील आहे ज्यामध्ये आपण संपूर्ण घटना पाहू शकता.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

(हे ही वाचा: Viral News: पोटातला गॅस विकून दर आठवड्याला ३७ लाख रुपये कमवणं पडलं महागात, व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय)

नक्की कसं काम करतं हे अॅप?

स्पूफ पेटीएम अॅपमध्ये तुम्हाला नाव, फोन नंबर, रक्कम, तारीख असे सर्व तपशील मिळतील. हे सर्व तपशील भरून फसवणूक करणारे तुम्हाला बनावट पुष्टीकरणे दाखवतात. हे दिसण्यामध्ये, तुम्हाला पेटीएमच्या अधिसूचनेप्रमाणेच दिसेल. ही सूचना इतकी खरी दिसते की ती पाहिल्यावर तुम्हाला कोणताही फरक दिसणार नाही. तुम्हाला वाटेल की पेमेंट झाले आहे पण प्रत्यक्षात कोणताही व्यवहार झाला नाही.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

गेल्या काही महिन्यांत पेटीएम स्पूफ अॅपचा वापर करून निष्पाप लोकांशी फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याचा वापर करून लोकांची सहज फसवणूक करतात. सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे. अशी अनेक प्रकरणे भारतभर नोंदवली गेली आहेत.

(हे ही वाचा: ‘हा’ हत्ती रस्ता वापरणाऱ्यांकडून घेतोय टोल; video होतोय व्हायरल)

अशा प्रकारची फसवणूक टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पेमेंटची पुष्टी करण्यासाठी बँकेच्या संदेशाची प्रतीक्षा करणे. जोपर्यंत तुम्हाला बँकेकडून संदेश किंवा तुमच्या फोनवर सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत पेमेंट पूर्ण झाले आहे असे मानू नका.