नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दाव्याला रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वार्षिक अहवालाने तडा दिला असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर नोटाबंदीचे समर्थन करण्यासाठी मोदी यांच्या समर्थकांकडून आक्रमकपद्धतीने मोहीम राबवल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर गुरुवारी #DemonetisationSuccess हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. ‘द वायर’ या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भात रंजक माहिती उघड केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला, असा दावा मोदी सरकारने केला होता. मात्र रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने मोदी सरकारच्या या समजुतीच्या फुग्यालाच टाचणी लागली. विरोधकांनी यावरुन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला. तर सरकारने नोटाबंदीचे फायदे पटवून देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्स अॅप या डिजिटल माध्यमांवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. ऐरवी भाजपसाठी ‘सोशल मीडिया टीम’ ट्विटरवर सक्रीय असते. पण नोटाबंदीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी थेट मंत्र्यांनाच सोशल मीडियाच्या रणांगणात उतरवले. स्मृती इराणी, डॉ. थावरचंद गेहलोत, मेनका गांधी, राव इंद्रजित सिंह, सुरेश प्रभू आदी मंत्र्यांनी #DemonetisationSuccess या हॅशटॅगचा वापर करत नोटाबंदीचे फायदे सांगणारे ट्विट केले. विशेष म्हणजे या सर्व मंत्र्यांनी ट्विटमध्ये वापरलेले शब्द आणि वाक्यरचना ही एक सारखीच होती. याच हॅशटॅगचा वापर करत काही युजर्सनेही ट्विट केले होते. या युजर्सच्या ट्विटमधील शब्द आणि वाक्यरचनाही समानच होती. त्यामुळे सरकारने सोशल मीडियावर नोटाबंदीमुळे फायदा झाला हे सांगण्यासाठी मोहीमच राबवली की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

छाया सौजन्य: द वायर

 

कसा येतो एखादा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये?
एखादा ब्रॅंड किंवा राजकीय पक्ष सोशल मीडियावरील प्रसिद्धी मोहिमेसाठी पीआर कंपन्यांची मदत घेतात. या पीआर कंपन्यांची सोशल मीडियावर एक टीम सक्रीय असते. या टीमकडे असंख्य सोशल मीडिया हँडल असतात आणि त्यांचे फॉलोअर्सही खूप असतात. हॅशटॅग ट्रेंडिगला आणण्यासाठी या टीमला ट्विट्सचे टेम्प्लेट दिले जातात. ठराविक वेळेत हे टेम्प्लेट टीमच्या विविध हँडल्सवरुन शेअर केले जातात. भाजपने यापूर्वीही अशा पद्धतीचा वापर केला होता. सोशल मीडियावर सरकारची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा भाजपचा हा प्रयत्न निवडणुकीत कितपत उपयोगी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp narendra modi government campaign demonetisation on social media demonetisationsuccess hashtag
First published on: 01-09-2017 at 12:59 IST