अनेकदा सोशल मीडियावर काही असे व्हिडीओ शेअर केले जातात, जे लोकांना प्रेरणा देण्याचं काम करतात. इच्छा तिथे मार्ग असं म्हटलं जातं. या म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो पाहून तुम्हीही सलाम ठोकाल. खरंतर हा व्हिडीओ प्रत्येकाच्या मनात उत्साह आणि उर्जा निर्माण करणारा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला समजेल की, वाटेत कितीही अडथळे आले तरी तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करायला पाहिजे. या व्हिडीओमध्ये असं नेमकं काय खास आहे ते जाणून घेऊया.

अनेकदा तुम्ही लोकांना स्केटिंग करताना पाहिले असेल, पण तुम्ही कधी अंध व्यक्तीला स्केटिंग करताना पाहिले आहे. नसल्यास, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये एक अंध व्यक्ती ज्या पद्धतीने स्केटिंग करत आहे ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्केटिंग करताना दिसत आहे. खरं तर या व्यक्तीला दिसत नाही, पण तरीही त्याने ध्येय सोडलं नाही. या व्हिडीओमध्ये एक अंध व्यक्ती स्केटिंग करत अप्रतिम स्टंट करताना दिसत आहे. यादरम्यान, त्याने हातात एक काठी देखील धरली आहे, ज्याच्या मदतीने तो पुढचा रस्ता ओळखत आहे आणि स्केटिंग करत आहे. या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती ज्या पद्धतीने स्केटिंग करत आहे ते खरोखरंच धक्कादायक आहे. तुम्ही पण पहा हा अप्रतिम व्हिडिओ.

आणखी वाचा : भिकाऱ्यासोबत पंगा घेतला, तर त्याने नोटांचा अक्षरशः पाऊसच पाडला… VIRAL VIDEO पाहून सारेच हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हत्तीणीचं दूध पिऊ लागली ही चिमुकली, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ‘त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण नशीब त्याला स्केटबोर्डिंग करण्यापासून रोखू शकलं नाही. आयुष्यात तुम्हाला जे हवंय त्यासाठी इतकं झगडावं की नशिबानेही गुडघे टेकावेत.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि कमेंटही करत आहेत.