Train Video Viral: सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काहीही करताना दिसतात. असे लोक स्टंटबाजी करीत लोकांचं लक्ष वेधत असतात. बरेच लोक आपल्या जीवाची पर्वा न करता स्टंटबाजी करतात. अनेक धोकादायक स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय; ज्यामध्ये एक व्यक्ती भरधाव धावणाऱ्या रेल्वेगाडीमध्ये स्टंट करताना दिसतेय. या तरुणाच्या धोकादायक व्हिडीओनं सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रेल्वे प्रवास करताना सावध राहा, अशा सूचना नेहमी केल्या जातात. कारण- रेल्वेगाडीचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे तुम्ही खाली पडलात, तर गंभीर दुखापत होऊ शकते. काही वेळा तर लोक जीवही गमावतात. अशा कितीतरी घटना जगभरात घडल्या आहेत अन् या घटनांचे व्हिडीओसुद्धा तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. तरीही काही लोक गैरवर्तणूक करताना नेहमी दिसतात. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये एक तरुण धोकादायक कृत्य करताना दिसत आहे. हा तरुण ट्रेनच्या छतावर उभा राहून स्टंट करीत असल्याचे दिसतेय. ट्रेन किती वेगाने धावत आहे, हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. पण, या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही, असं दिसतंय.

(हे ही वाचा : भररस्त्यात चालत्या कारमधून उतरत होता तरुण; तोल जाऊन दरवाजाला लटकंती अन् पुढे जे घडलं… पाहा व्हिडीओ, सांगा चूक कुणाची?)

या व्हिडीओमध्ये तुम्ही ट्रेनच्या छतावर स्टंटबाजी करणारा एक तरुण पाहू शकता. तो आधी रेल्वेच्या खिडकीतून बाहेर आला आणि रेल्वेच्या छतावर जाऊ लागला. व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, तो कोणत्याही भीतीशिवाय छतावर स्टंट करीत आहे. हा तरुण धोकादायक स्टंट करतोय; पण आपण जीव धोक्यात घालतोय हेच मुळी त्याच्या लक्षात येत नाही. यादरम्यान अचानक त्याला ट्रेनच्या हाय-व्होल्टेज तारांचा धक्का लागतो आणि तो बेशुद्ध पडतो. या तरुणाला एवढा जोरदार विजेचा धक्का बसतो की, त्यामुळे तो जबरदस्त भाजतो. आता व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटतंय की, त्या तरुणाचा मृत्यू झाला असावा. तथापि, आमच्याकडे याबाबतची स्पष्ट माहिती नाही म्हणून आम्ही या व्हिडीओची पुष्टी करू शकत नाही. तरुणाचे नंतर काय होते हे कळू शकले नाही.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ शेअर करताना एका युजरने लिहिले, “हे व्हायला हवे होते. कारण- याला स्टंट नाही, तर वेडेपणा म्हणायला हवे.” एका युजरने लिहिले, “आजचे तरुण वेडे झाले आहेत. ते व्हायरल होण्यासाठी ज्या पद्धतीने स्टंट करत आहेत, ते त्यांच्या मृत्यूला आमंत्रण देत आहेत.” एका युजरने लिहिले, “त्याचा मृत्यू झाला आहे. पाहा वायरला तो कसा अडकला?” या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले, “यावर कठोर कायदा बनवावा. स्टंटच्या नावाखाली किती मुले मरतील, याची कोणालाच कल्पना नाही.”