सोशल मीडियावर रोज काहीतरी नवं आणि अनोखं पाहायला मिळतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घटनांची कमतरता नाही. इथे तुम्हाला डान्स, ॲक्टिंगपासून मारामारी, विचित्र कृती. तसेच लोकांच्या मूर्खपणाचेही अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. इन्स्टाग्राम, फेसबुक व ट्विटरवर दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक व्हिडीओतील घटनेवर कमेंटमधून त्यांच्या प्रतिक्रियाही देत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचा मूर्खपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकही त्याला फटकारू लागले आहेत. काही लोकांना स्टंटबाजीची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच स्टंटबाजीद्वारे लोकांचं लक्ष वेधून घेतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस जीवावरदेखील बेतते, हे कसं यांना कळत नाही.

कार आणि बाईकवर तरुणांकडून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्टंटचे तुम्ही बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील; जे थांबविण्यासाठी पोलीसही ‘ॲक्शन मोड’मध्ये असतात. हे स्टंट पाहताना जरी भारी वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र असे स्टंट बऱ्याचदा जीवावर बेततात. काही लोकांना असे करताना गंभीर दुखापतीही झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. सध्या असाच एक स्टंट व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये एक तरुण विचित्र वागतो आहे.

(हे ही वाचा : दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

जेव्हा तुम्ही वाहनाने प्रवास करता तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवत असाल ना? त्यामध्ये तुम्ही तुमचे हात खिडकीतून बाहेर काढणार नाही, तुम्ही गाडीत व्यवस्थित बसलेले असाल आणि मुख्य म्हणजे गाडी थांबल्यावरच तुम्ही खाली उतराल. पण, व्हायरल व्हिडीओमध्ये उलटेच चित्र पाहायला मिळाले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा मागचा दरवाजा उघडून चालत्या वाहनातून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत आहे. आता त्याच्या उतरण्याची दिशा आणि वाहनाच्या पुढे जाण्याची दिशा या दोन्ही विरुद्ध असल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो गाडीसह फरपटत काही अंतर पुढे ओढला गेला. चालत्या कारच्या दरवाजाला पकडून तरुण लटकत असल्याचे व्हिडीओतून दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @PalsSkit नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडीओ १८०० हून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “हा काय प्रकार आहे, चालत्या गाडीतून असं का उतरताय?” दुसऱ्या युजरने लिहिले, “अरे, ही लँडिंगची कोणती शैली आहे?” तिसऱ्या युजरने लिहिले, “लोकांचा मेंदू खरोखर कमी काम करू लागला आहे भाऊ.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.