Viral Video : हॉस्टेलचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतात. या दिवसांच्या आठवणी कायम स्मरणात राहतात. हॉस्टेलची मैत्री आणि मित्रांबरोबर एकत्र घालवलेले क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. या दिवसांमध्ये हॉस्टेलमध्ये केलेल्या खोड्या आणि मित्रांबरोबर रात्रीच्या वेळी केलेली मजा, असे अनेक किस्से तुम्ही हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऐकले असेल किंवा तुमच्यापैकी काही लोकांनी हॉस्टेलचे दिवस जगले असेल. सोशल मीडियावर हॉस्टेल आणि तेथील अनेक मजेशीर किस्से व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक हॉस्टेलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेली एका मुलगा मुलीची कपडे घालून चक्क गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरला आणि रंगेहाथ पकडला. पुढे त्याच्याबरोबर काय घडलं, हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मुलगा मुलीचे कपडे घालून गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरला. पण त्यानंतर हॉस्टेलच्या व्यवस्थापकांनी त्याला रंगेहाथ पकडले. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की शिक्षा म्हणून हे व्यवस्थापक त्याला काठीने मारहाण करताना दिसत आहे. यावेळी अनेक विद्यार्थी उपस्थित होते. हा मुलगा गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुलीच्या वेशभूषेत का आला होता, यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. काही लोकांना त्यांच्या हॉस्टेलचे दिवस आठवतील तर काही लोकांना हॉस्टेलच्या दिवसांमधील अशीच एखादी घटना आठवू शकते.

Delhis Vada Pav Girl Get Into Ugly Fight With Crowd On Streets
“ज्यानी तुला पाठवले त्याचा…”, वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral
An elephant comes at hospital to meet his older sick caretaker
हत्तीने जपली खरी माणुसकी! आजारी वृद्ध केअरटेकरला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला हत्ती, VIDEO Viral
a lady cherishes motherhood with passion
VIDEO : बाळ कडेवर घेऊन वाजवतेय ढोल ताशा! आवडीबरोबर मातृत्व जपणाऱ्या आईचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

हेही वाचा : बापरे! चालत्या बसमध्ये बस कंडक्टरने उचलला महिलेवर हात, घटनेचा VIDEO व्हायरल होताच कंडक्टरला केले निलंबित

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” मुलीचे कपडे घालून मुलगा गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरला आणि पकडला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशी लाजीरवाणी गोष्ट करून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात?” तर एका युजरने लिहिलेय, “ही फालतू ट्रिक होती” आणखी एका युजरने लिहिलेय, “जे लोक नियम मोडतात त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे.” एक युजर लिहितो, “प्रेमात मुलं आंधळे होतात.”