एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक, मित्र-परिवार त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात. अंत्यविधीच्या वेळी सर्वजण स्मशानात जातात. जेणेकरून त्याच्या आत्म्यास शांती मिळेल. परंतु जरा विचार करा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्याचा मित्र-परिवार स्मशानात पोहोचला आणि त्यांनी त्या व्यक्तीला तिथे जीवंत पाहिलं तर काय होईल? लोकांना यामुळे मोठा धक्का बसू शकतो. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूची बातमी कळताच अनेकजण त्याच्या अंत्यविधीसाठी स्माशानात पोहोचले आणि या लोकांनी मृत व्यक्तीला तिथे जीवंत पाहिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना ब्राझीलमधली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या व्यक्तीचं नाव बाल्टाझार लेमोस असं आहे. बाल्टाझारने त्याच्या मृत्यूचं खोटं नाटक रचलं होतं. त्याने सर्वप्रथम त्याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली. त्यानंतर त्याची खोटी अंत्ययात्रा देखील काढली. मोठ्या संख्येने लोक त्याच्या अंत्ययात्रेत पोहोचले.

‘खरा’ मित्र-परिवार ओळखण्यासाठी खोटं नाटक

अत्यविधीच्या वेळी स्मशानात पोहोचलेल्या लोकांनी बाल्टाझारला तिथे जीवंत पाहिलं तेव्हा अनेकांना धक्का बसला. बरेच जण त्याच्यावर नाराज झाले. त्यावेळी बाल्टाझार सर्वांना समजवत म्हणाला की, मला फक्त इतकं पाहायचं होतं की, “मी मेल्यावर कोण-कोण माझ्या अंत्ययात्रेत सहभागी होईल. मी केवळ माझा खरा मित्र-परिवार ओळखण्यासाठी ही खोटी अंत्ययात्रा काढली.”

हे ही वाचा >> “कालपासून जेवलो नाही, भुकेने व्याकुळलोय…”, दुकानातली मिठाई खाण्यापूर्वी चोराने लिहिलं हृदय हेलावणारं पत्र

बाल्टाझारचा हा प्रताप पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अलिकडेच फेसबुकवर त्याच्या मृत्यूची बातमी पसरली होती. हे देखील त्यानेच केलं होतं. तसेच ही बातमी पसरवत असताना त्याने अंत्ययात्रेची माहिती देखील पसरवली होती. त्यानुसार त्याचे नातेवाईक आणि मित्र-परिवर असे सर्वजण त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brazilian man organized his fake death to see how many people attend his funeral asc
First published on: 29-01-2023 at 11:29 IST