scorecardresearch

लग्नात नवरा नवरीची जबरदस्त एन्ट्री! VIRAL VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’

हा व्हिडीओ पाहून तुमची नजर व्हिडीओवरून हटणारच नाही.

लग्नात नवरा नवरीची जबरदस्त एन्ट्री! VIRAL VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’
(Photo: Youtube/ Indian Wedding)

Bride Groom Viral Video : लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत किंवा नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाहीत. अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो… लग्नात नवरा-नवरीची एन्ट्री हा विषय पाहण्यासारखा झालाय. सध्या सोशल मीडियावर नवरा-नवरीच्या हटके एन्ट्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमची नजर व्हिडीओवरून हटणारच नाही.

नव्या नवरीसाठी त्यांच्या लग्नाचा दिवस खूप स्पेशल असतो. दोघेही या प्रत्येक मौल्यवान क्षणाची वाट पाहत असतात. त्यातच दोघांच्या एन्ट्री ही लग्नातला सर्वात आकर्षणाचा भाग असतो. ही एन्ट्री हटके करण्यासाठी अनेक नवरा नवरी वेगवेगळी आयडिया शोधतात. स्वतःची एन्ट्री स्पेशल करण्यासाठी या व्हायरल व्हिडीओमधले नवरा नवरी डान्स करत करत स्टेजवर एन्ट्री करतात. हे सर्व घडत असताना सर्वांच्या नजरा फक्त नवरा आणि नवरीवर खिळून राहतात. नवरदेव आणि नवरीला लग्नाचा इतका आनंद झाला की, दोघेही लग्न मंडपामध्ये नाचायलाच लागतात. यावेळी नवरीचा उत्साह मात्र पाहण्यासारखा आहे. फक्त तुम्हीच काय तर स्वतः नवरदेव सुद्धा नवरीचा डान्स पाहून थक्क होतो. नवरदेव फक्त नवरीला पाहत राहतो. नवरीचा जोश पाहून मग नवरदेव सुद्धा तिच्यासोबत थिरकू लागतो.

आणखी वाचा : Navratri 2022 : न्यूयॉर्कमध्येही चढला गरब्याचा फिव्हर, टाइम्स स्क्वेअरवर महिलांच्या गरब्याचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Navratri 2022 : मुंबई लोकल ट्रेनमधला गरबा पाहिलात का? हा VIRAL VIDEO तुम्हाला सुद्धा थिरकण्यास भाग पाडेल

हे दृश्य फारच गोड आहे. दोघेही नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येतो. हा व्हिडीओ इंडियन वेडिंग नावाच्या युट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. लोक या व्हिडीओमधील नवरा-नवरीच्या बॉण्डिंचं कौतुक करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ६२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर सहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या