Bridge Accident Fact Check Video : पावसात अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता आता लाईटहाऊस जर्नालिझमलाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असलेला एक व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओमध्ये, एका उंच डोंगरावरील दोरीचा पूल अचानक कोसळतानाचे दृश्य दिसतेय. हा व्हिडिओ इंडोनेशियातील बाली येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे, पण खरंच इंडोनेशियामध्ये अशी कोणती घटना घडली का, तसेच हा व्हिडीओ खरा आहे की खोटा याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर विपिन कुमारने हा व्हिडिओ त्याच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.

इतर युजर्स देखील हाच एआय-निर्मित व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओमधून घेतलेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

आम्हाला सहा दिवसांपूर्वी kolotiv.ai या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळला.

हँडलच्या बायोमध्ये असे लिहिले होते: Sergey Kolotov | Neural Network Specialist & AI Creator
ब्रँड्स आणि सहयोगासाठी व्हिज्युअल एआयद्वारे वास्तववादी जाहिरात
दरमहा 60M+ व्ह्यूज
सहयोग → डीएम

निर्मात्याने त्यांच्या बायोमध्ये ते एआय क्रिएटर असल्याचे नमूद केले होते.

आम्ही नंतर व्हिडिओचे स्क्रीनशॉट एआय डिटेक्टरमधून तपासले तेव्हा आढळले की, हा व्हिडीओ एआय वापरून तयार केला गेला आहे.

आम्ही इंडोनेशियातील बालीमध्ये असा कोणताही अपघात झाल्याच्या अलीकडे कोणत्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का हे देखील पाहिले, परंतु आम्हाला काहीही आढळले नाही.

निष्कर्ष:

इंडोनेशियातील बालीमध्ये दोरीचा पूल कोसळल्याचा व्हायरल व्हिडिओ एआय निर्मित आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ खोटा आहे.