British YouTuber track his stolen AirPods in Pakistan : प्रसिद्ध ब्रिटिश युट्यूबर लॉर्ड माइल्स याचे दुबईतील एका हॉटेलच्या खोलीतून जवळपास एका वर्षभरापूर्वी एअरपॉड्स प्रो चोरीला गेले होते. विशेष म्हणजे अॅपलच्या फाइंड माय ट्रॅकिंग सिस्टमचा वापर करून माइल्सने नुकतेच त्याचे हे वायरलेस इयरबड्स पाकिस्तानातील झेलम या भागात असल्याचे ट्रॅक केले आहे. यानंतर आता माइल्स हा ते एअरपॉड्स पाकिस्तानातून परत आणण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. त्याने त्याचा प्लॅन जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहेत.

माइल्सचा नेमका प्लॅन काय आहे?

माइल्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने फाइंड माय अॅपचा स्क्रीनशॉट देखील जोडला आहे. ज्यामध्ये त्याच्या एअरपॉड्सचे लोकेशन झेलममधील डिफेन्स रोडवरील सेकंड वाइफ रेस्टॉरंट जवळ दाखवत आहे. हा स्क्रीनशॉट घेण्याच्या फक्त ३० मिनीटांपूर्वी हे एअरपॉड्स वापरले जात होते, त्यामुळे चोरीला गेल्यापासून एक वर्ष झाले असले तरी हे एअरपॉड्स सध्या वापरात असल्याचे स्पष्ट झाले.

माझे एअरपॉड प्रो पाकिस्तानात गेल्या एक वर्षापासून हरवले आहेत, आणि पुढच्या आठवड्यात तिथे जाऊन माझी प्रॉपर्टी परत घेणार आहे, असे माइल्सने म्हटले आहे. “ते (एअरपॉड्स) दुबईतील माझ्या हॉटेलमधून चोरीला गेले आणि पाकिस्तानात पोहोचले. मी लॉस्ट मोड चालू केला आणि तो (चोर) एअरपॉड्स वापरत असताना ‘फाइंड मी’असा आवाज करत राहिलो,” असेही माइल्सने सांगितले आहे.

त्याची चोरीला गेलेली वस्तू परत मिळवण्याचा निर्धार केलेल्या माइल्सने पाकिस्तान पोलिसांची मदत घेणार आणि ही संपूर्ण मोहिम रेकॉर्ड करणार असेही सांगितले आहे. “मी एका पोलीस अधिकार्‍याला घेणार आणि त्या भागात घुसणार, माझे एअरपॉड्स परत मिळवणार आहे आणि ते सर्व रेकॉर्ड करणार. मला चोर आवडत नाहीत!” त्याने त्याने सोशल मीडियावर लिहिले आहे.

माइल्सच्या या धाडसी निर्णयानंतर सोशम मीडियावर यावरून वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत, अनेकांनी हा निर्णय निष्फळ ठरेल असेही म्हटले आहे. “तो भारताचा भाग होईपर्यंत तू वाट पाहू शकतोस. तेव्हा ते परत मिळवणं जास्त सोपं जाईल. पाकिस्तानला जाण्याआधी स्वत:चा भरपूर इन्शुरन्स काढून बरोबर घेऊन जा आणि गॅलनभर पाणीदेखील, सध्या त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही,” अशी मजेशीर कमेंट एका वापरकर्त्याने केली आहे. “तू धोकादायक खेळ खेळतो आहेस,” अशी प्रतिक्रिया दुसर्‍या एका वापरकर्त्याने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.